-rat३०p१८.jpg-
२५N८८१९०
दापोली ः आसूद येथील केशवराज मंदिराची प्रतिकृती.
---
दापोलीत श्री केशवराज मंदिराची प्रतिकृती
रेमजे परिवाराने साकारला देखावा ; कलाप्रेमींकडून दाद
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ३० ः तालुक्यातील वडाचाकोंड येथील रेमजे परिवाराने आसूद गावातील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या श्री केशवराज मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारली आहे. धार्मिकतेबरोबरच कलात्मकतेचा संगम घडवणारी ही सजावट कलाप्रेमींना चांगलीच भावलेली आहे.
रेमजे परिवारातर्फे गेल्या सव्वाशे वर्षांपेक्षा एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आतापर्यंत या कुटुंबाने ‘ग्लोबल वॉर्मिंग’, ‘व्यसनमुक्ती’, ‘दहशतवादविरोधी हल्ले’, ‘ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण’ यांसारखे सामाजिक विषय मांडले आहेत तर ‘समुद्रमंथन’, ‘विष्णूअवतार’, ‘श्रीराम अवतार’, ‘श्रीकृष्ण अवतार’ अशा पौराणिक प्रसंगांचे देखावे उभारून भक्तांची मने जिंकली आहेत. यंदा उभारलेल्या श्री केशवराज मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये सूक्ष्म तपशिलांपासून परिसरातील निसर्गसौंदर्यापर्यंत बारकाईने चित्रण करण्यात आले आहे. या कलाकृतीमुळे जणू भक्त आसूद गावातल्या मंदिरातच दर्शन घेत आहोत, असा भास होतो. देखाव्याची कल्पना आणि रचना अमित रेमजे यांची असून, त्यांना पंकज, विजय, प्रदीप, दीपक, रूपेश, सिद्धेश तसेच बालकलाकार दिव्या व अवनी यांची साथ लाभली. वसंत, प्रकाश, मारुती आणि अनंत रेमजे या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे या उपक्रमाला योग्य आकार मिळाला.
कोट
गेल्या १५० वर्षांपासून आमच्या रेमजे कुटुंबाची गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू आहे. ती परंपरा जपत आम्ही दरवर्षी नवनवीन सामाजिक व पौराणिक विषयांवर देखावे उभे करतो. यावर्षी श्री केशवराज मंदिराची प्रतिकृती साकारून श्रद्धा आणि पर्यटन यांचा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे. - अमित रेमजे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.