कोकण

राज्यनाट्य स्पर्धेच्या प्रवेशिकासाठी मुदतवाढ

CD

‘राज्य नाट्य’ प्रवेशिकांसाठी
१०पर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या, राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील विविध वर्गवारीसाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख आजपर्यंत होती. मात्र गणेशोत्सव, पाऊसमान आणि इतर बाबीमुळे काही नाट्यसंस्था व संघटनांनी या प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे केली होती. जास्तीत जास्त संघाना या स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी, प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य संचालनालयास केली होती. या सूचनेच्या अनुषंगाने प्रवेशिका सादर करण्यास १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे. इच्छुक संघानी https://mahanatyaspardha.com या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


अनारीतील पुणे मंडळ
कार्यकारिणी जाहीर
चिपळूण ः अनारी गावातील मूळ ग्रामस्थ परंतु, सध्या पुणे येथे नोकरी, व्यवसायानिमित्त वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांनी स्थापित केलेल्या हनुमान समाजसेवा मंडळाची नूतन कार्यकारिणी पुणे येथे जाहीर करण्यात आली. अनारी गावातील ग्रामस्थ आणि सध्या पुण्यामध्ये राहणारे सखाराम पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मंडळाच्या अध्यक्षपदी राजेंद्र जाधव तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत शिबे, खजिनदारपदी हनुमान कोठारे, उपखजिनदारपदी समीर शिर्के, सचिवपदी सुशांत तळेकर तर उपसचिवपदी राकेश जाधव, हिशोब तपासनीस रवींद्र तळेकर, सागर पवार, कार्याध्यक्ष रोशन तळेकर, अजय शिबे, सल्लागार सखाराम पवार, सखाराम कृ. तळेकर यांची वर्णी लागली आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: काश्मीरची लेडी सिंघम मैदानात! एन्काऊंटर स्पेशालिस्ट IPS शाहिदा स्फोटाच्या स्थळी दाखल

Tata Safari अन् Harrier फेसलिफ्टची लॉन्च डेट कंफर्म; 'या' दिवशी मार्केटमध्ये पदार्पण करणार दमदार कार, तेही अगदी परवडणाऱ्या दरात

Syncope Symptoms: अभिनेता गोविंदाला झालेला सिंकोपी आजार नेमका काय? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Latest Marathi Breaking News Live : नाशिक कुंभमेळ्यासाठी राज्य सरकार सज्ज! पाचपट भाविकांची अपेक्षा, २० हजार कोटींची कामे सुरु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CA After 12th: CA बनण्यासाठी १२वी नंतर काय करावं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

SCROLL FOR NEXT