कोकण

कुडाळात ७ नोव्हेंबरपासून ''केपीएल'' महोत्सव

CD

swt23.jpg
N88840
कुडाळः पत्रकार परिषदेत बोलताना रणजित देसाई, मनीष दाभोलकर. बाजूला उमेश गाळवणकर, राजन नाईक, केदार सामंत, अतुल सामंत, प्रशांत धोंड, श्री. नेरुरकर आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळात ७ नोव्हेंबरपासून ‘केपीएल’ महोत्सव
रणजित देसाईः कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ः गौड ब्राह्मण सभा गिरगाव मुंबई संकल्पित व कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित दहाव्या ‘केपीएल’ अर्थात कुडाळदेशकर प्रीमियर लीग या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन ७, ८ व ९ नोव्हेंबर कालावधीत कुडाळ येथे करण्यात आले आहे. येथील कुडाळ हायस्कूल मैदान आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी येथे हा महोत्सव होणार आहे. यात विविध क्रीडा स्पर्धांसह कला दालन, प्रदर्शन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे, अशी माहिती कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजित देसाई, केपीएलचे क्रीडा संघटक मनीष दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील एमआयडीसीतील बॅ. नाथ पै शैक्षणिक संकुल येथे सोमवारी (ता. १) सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत श्री.देसाई बोलत होते. यावेळी मनीष दाभोलकर, उमेश गाळवणकर, केदार सामंत, प्रशांत धोंड, राजन नाईक, प्रफुल्ल वालावलकर, गुरू देसाई, रोहन देसाई, अतुल सामंत, प्रदीप नेरुरकर, तृप्ती प्रभुदेसाई, अमित तेंडोलकर, प्रसाद नाईक, अभय वालावलकर, प्रथमेश नाईक, स्वानंद सामंत, सुहास खानोलकर, डॉ.प्र णव प्रभू, गौरव प्रभू आदींसह कोअर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, "गौड ब्राह्मण सभा मुंबई यांच्या संकल्पनेतून गेली नऊ वर्षे देशातील विविध भागांमध्ये कुडाळ देशकर जातीबांधवासाठी विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गोरेगाव, पनवेल, कुडाळ, गोवा, डोंबिवली, रत्नागिरी, मेंगलोर व पुणे येथे आजपर्यंत केपीएलचे नऊ महोत्सव पार पडले आहेत. यावर्षीचा दहावा महोत्सव दिमाखात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व अन्य राज्यांतील सुमारे २७ ज्ञाती संस्थांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते. या अगोदर देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याने दोन वेळा यजमानपद स्वीकारून महोत्सवाचे आयोजन केले होते.
या महोत्सवामध्ये पुरुष व महिलांसाठी क्रिकेट, बॅटमिटन, चेस व कॅरम स्पर्धा तसेच दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले आहे. कुडाळ हायस्कूल मैदान आणि तहसीलदार कार्यालय नजीक मैदानावर क्रीडा स्पर्धा, तर एमआयडीसी बॅ. नाथ पै शैक्षणिक संकुल येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ज्ञातीमधील विविध क्षेत्रातील कलाकारांचे कलादालन उभारण्यात येणार असून यामध्ये सुमारे १०० पेक्षा अधिक कलाकार आपल्या विविध कलाकृतींची मांडणी करणार आहेत. सिंधुदुर्गासह भारतभरातून यावर्षी सुमारे ५००० जातीबांधव यमध्ये सहभागी होणार आहेत."
स्पर्धेतील नोंदणीसाठी ऑनलाइन अॅप केले असून त्याचे उ‌द्घाटन करून नोंदणीचा प्रारंभ बॅ. नाथ शैक्षणिक संकुल येथे पार पडला. यावर्षीच्या ट्रॉफी व मेडल्स पूर्णपणे नैसर्गिक वस्तूंपासून व पर्यावरणपूरक करण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या उ‌द्घाटनाला कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीमधील राजकीय, सामाजिक, व्यवसाय, साहित्य, क्रीडा व उ‌द्योग विश्वातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने केपीएलची ‘अश्वमेध’ ही स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. महोत्सवाचे नियोजन मार्चपासूनच सुरू झालेले आहे, असे यावेळी श्री. देसाई व श्री. दाभोलकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उजनी धरणात १२२ टीएमसी पाणी! २० जूनपासून धरणातून सोडले पुन्हा एकदा धरण भरेल इतके पाणी; धरणाच्या पाण्यावर दररोज २ कोटी ३० लाख युनिट वीजनिर्मिती

Ganesh Visarjan 2025: गणरायाला आठव्या दिवशी अर्पण करा बिस्किटासारखे खुसखुशीत तळणीचे मोदक, सर्व मनोकामना होतील पुर्ण

Manoj Jarange-Patil: राजेंचा शब्‍द आमच्‍यासाठी अंतिम: मनोज जरांगे-पाटील; सातारा गॅझेटियरची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजेंकडे

Devendra Fadnavis on cabinet subcommittee : मराठा आंदोलनावर यशस्वी तोडगा! मंत्रिमंडळ उपसमितीचं फडणवीसांकडून विशेष कौतुक, म्हणाले...

KCR News : केसीआर यांनी स्वत:च्या मुलीची पक्षातून केली हाकालपट्टी; BRS मधील अंतर्गत वादाला नवे वळण

SCROLL FOR NEXT