कोकण

-जिल्ह्यात २०४७ शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज

CD

पिकविमा योजनेत खेड-दापोली आघाडीवर
जिल्ह्यात २०४७ शेतकऱ्यांचे अर्ज ; सर्वात कमी लांजा, गुहागर, रत्नागिरीत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : प्रधानमंत्री पिकविमा योजना यंदा नव्या स्वरूपात रत्नागिरी जिल्ह्यात लागू झाली असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतीनंतर जिल्ह्यातील खरीप हंगामातील भात व नाचणी पिकांसाठी २ हजार ४७ शेतकऱ्यांनी ५४२.५९ हेक्टर क्षेत्रावरील पिकविम्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी ४०७ शेतकऱ्यांनी पिककर्जासाठी अर्ज दाखल केले तर १ हजार ६४० बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. पिकविम्यासाठी २.४० लाखांचे अनुदान मिळणार आहे. सर्वाधिक अर्ज खेड, दापोली, चिपळूण तालुक्यातून आले असून, सर्वात कमी लांजा, गुहागर, रत्नागिरी तालुक्यातून आले आहेत.
जिल्ह्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी ३१ जुलै शेवटची तारीख होती. त्यानंतर प्रतिसाद मिळत नसल्यामुळे १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढीनंतर २ हजार ४७ शेतकऱ्यांनी पिकविम्यासाठी अर्ज दाखल केले आहेत तर मागील वर्षी कर्जदार, बिगरकर्जदार मिळून १४ हजार ३२४ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी पिकविम्यासाठी अर्जाची संख्या वाढली आहे. दरम्यान, या योजनेत सहभागी होण्यासठी अॅग्रीस्टॅग शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असून, पिकविमा नुकसानीसाठी ई-पीकपाहणी अंतर्गत पिकांची नोंद बंधनकारक आहे. जिल्ह्यातील ८३ महसूल मंडलासाठी भात व नाचणी पिकांसाठी ही योजना लागू असून, कर्जदार, बिगरकर्जदार शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत.
----
कोट
पिकविमासंदर्भात मुदतवाढ देण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला असून, २ हजार ४७ शेतकऱ्यांनी ५४२.५९ हेक्टर क्षेत्रावरील पिकविम्यासाठी अर्ज केले आहेत. ४०७ शेतकऱ्यांचे पिककर्जासाठी अर्ज आले आहेत. मागील वर्षापेक्षा यंदा पिकविम्यासाठी प्रतिसाद चांगला आहे.
- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी

चौकट
तालुकानिहाय पिकविमा अर्ज
तालुका * शेतकरी संख्या* क्षेत्र हेक्टर
चिपळूण* ३२०* १०९.१४
दापोली* ३३२* ७२.११
गुहागर* ८७* २१.२८
खेड* ५७१* १६२.८५
लांजा* ५३* १६.६७
मंडणगड* ३०१* ६१.३६
राजापूर* १५८* ४८.८९
रत्नागिरी* ९४* १८.२८
संगमेश्वर* १३१* ३२.०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA , 2nd Test: जैस्वाल लढला, पण सुदर्शन, जुरेल, पंत मात्र फेल; भारताचा अर्धा संघ तंबूत, फॉलोऑन टाळण्याचं आव्हान

Kolhapur : आमचं गाव नाही का, विमानानं जाणारीच माणसं आहेत काय? रस्त्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक, विमानतळावर आंदोलन

Latest Marathi News Live Update : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटांत तुंबळ हाणामारी

Chhatrapati Sambhajinagar: प्रेमात पडलेल्या मुलीकडून घरात चोरी! ११ लाख पळवल्यावर आई वडिलांनी केलेलं माफ; पुन्हा दागिन्यांवर डल्ला

Sinhagad Fort: खासदार नीलेश लंकेंचा पुढाकार! सिंहगडावर ‘आपला मावळा’कडून स्वच्छता; शेकडो शिवभक्तांचा सहभाग..

SCROLL FOR NEXT