rat५p१०.jpg -
P२५N८९६४८
रत्नागिरी ः बापेरे (ता. लांजा) येथील अभिनेता किशोर साळुंखे यांनी लाकडी बांबू, गवत, सुंब याने साकारलेला देखावा.
-----
अभिनेता किशोर साळुंखेंचा अनोखा देखावा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः बापेरे-तेलीवाडी (ता. लांजा) येथील अभिनेता किशोर साळुंखे यांनी घरगुती गणपती देखाव्यात टाकाऊपासून टिकावू ही संकल्पना वापरून गणेशभक्तांना भुरळ घातली आहे. गणेशोत्सवात अनेकांची पावले हा देखावा पाहण्याकडे वळली आहेत. एकांकिका, नाटकं गाजवणारा तसेच मालिकांसह चिकी चिकी बुबूम बूम आणि जिलेबी या सिनेमात काम करून आपल्या बोलक्या अभिनयाने रसिकांच्या हृदयात साळुंखे यांनी जागा निर्माण केली आहे.
मांगल्याचे प्रतीक, कलेची देवता गणरायाच्या आशीर्वादानेच त्यांचा गाव ते मुंबई, असा अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरू आहे. लाडक्या गणरायाचे आगमन झाल्याने सर्वत्र नवचैतन्य बहरून येते. घरी विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाची ११ दिवस मनोभावे सेवा करतात तसेच बापेरे गाव निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या किशोर साळुंखे दरवर्षी घरी मखर करताना वेगळेपण साधण्याचा प्रयत्न करतात. यावर्षी त्यांनी लाकडी बांबू, गवत, सुंब व जात, घरातील पाण्याचा हंडा, कळशी यांचा वापर करून मखर तयार केले आहे. मुंबईत टोलेजंग इमारतीत वावरताना घरी येऊन निसर्ग, पर्यावरण देखाव्यातून संकल्पना मांडावी, हाच यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यांची अभिनयाची सुरुवात गावातील नाटकांमधील छोट्या-मोठ्या भूमिकेने झाली. त्यांनी व्यावसायिक रंगभूमी वेबसीरिज, मालिकांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवून रसिकांची दाद मिळवली आहे. शहरी भागापेक्षा गावाकडील गणेशोत्सव म्हणजे माणुसकी आणि भक्तीमार्ग जोडणारा उत्सव असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सव काळात मुंबई, पुणे अन्य शहरामध्ये वास्तव्याला असलेले गावकरी गावकडे येतात. त्यामुळे गावात माणसांची वर्दळ वाढलेली असते. प्रत्येकजण एकमेकांची भेट घेत असतो. साळुंखे अभिनय क्षेत्रासाठी गावाकडून शहराकडे गेले असले तरी त्यांची गावाची ओढ कायम आहे. अगदी वेळात वेळ काढून गावच्या उत्सवासाठी ते येतात. अभिनय क्षेत्रात करिअर करताना त्यांनी एकांकिका नाटक त्यानंतर हळुहळू वेबसीरिजमध्ये काम केले. यामध्ये कोकणची माणसं आंबट-गोड, आक्रित झो, पप्याची गर्लफ्रेंड, संगमेश्वरी डिस्कवरी यांसह प्रेमखुळा या मराठी गाण्यात मुख्य अभिनय केला आहे.
-------
कोट...
गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाच्या भेटीची उत्सुकता मोठी असते. त्यासाठी आवर्जून गावी येतो. गणेशोत्सव काळात मनाला सुखद आनंद मिळतो. हा आनंद शहरात अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे शहरामधील उत्सवापेक्षा आमच्या गावच्या गणेशोत्सवाची परंपरा टिकली पाहिजे.
-किशोर साळुंखे, अभिनेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.