-rat८p१२.jpg-
२५N९०१७९
पावस ः तालुक्यातील रनपार बंदरामध्ये दोन महिने उभा असलेला भरकटलेला बार्ज.
-----
भरकटलेला बार्ज अद्याप जैसे थे
रनपार बंदरात विसावला ; तांत्रिक समस्येचे कारण
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ८ ः गोव्यावरून बेलापूरला निघालेले बार्ज तांत्रिक अडचणीमुळे भरकटला आणि तो रनपार बंदरात विसावला होता. परंतु दोन महिने उलटले तरी तो अजून त्याच ठिकाणी आहे.
दोन महिन्यापूर्वी बार्ज, टग व छोटी होडी गोव्यावरून बेलापूरला समुद्रमार्गे निघाली होती. परंतु त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा बाज भरकटला आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने रनपार बंदरात विसावला होता. याची माहिती मिळाल्यावर तातडीने पूर्णगड सागरी पोलिस ठाणे, कस्टमचे अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि संबंधित मालकाशी संपर्क केला. त्यावेळी तांत्रिक अडचणीमुळे बार्ज भरकटल्याचे निदर्शनास आले. या बार्जची तपासणी करण्यात आली आणि कोणताही अनिश्चित प्रकार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी बार्जमध्ये दहा ते बारा खलाशी होते. त्यानंतर मालकांनी येऊन त्याच्या दुरुस्ती संदर्भात हालचाली सुरू केल्या. परंतु दोन महिने झाले तरी अद्याप मालकाने हे बार्ज नेलेले नाही.
यासंदर्भात पोलिस अंमलदार महेश मुरकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, सुरुवातीपासून आमचे सागरी पोलिस ठाणे यावर विशेष लक्ष ठेवून आहे. त्या बार्जमध्ये कोणतेही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळून न आल्यामुळे परिसरामध्ये गस्त सुरू आहे. संबंधित बार्जचे मालक तांत्रिक अडचणी दूर करून ते घेऊन जाईल अशी शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.