भावी नगरसेवकांसाठी कार्यशाळा
चिपळूण, रत्नागिरीत परशुराम एज्युकेशनतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : आगामी नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका समोर ठेवून भावी नगरसेवकांसाठी एका विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन चिपळूण व रत्नागिरीमध्ये करण्यात आले आहे. परशुराम एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (चिपळूण) आणि जनजागृती संघ (रत्नागिरी) यांच्या सहयोगाने १५ला चिपळूण व १६ला रत्नागिरीत ही कार्यशाळा होईल. यात व्यवस्थापन, राज्यशास्त्रतज्ज्ञ दीपक करंजीकर (मुंबई), निवडणूक प्रचार व्यवस्थापन, निवडणूक समन्वयक धनंजय खाडिलकर (सांगली) आणि अभियंता, वकील, राजकीय सल्लागार हृषिकेश कुलकर्णी (सांगली) मार्गदर्शन करणार आहेत.
भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी व प्रभावी लोकशाही आहे. तिच्या मजबुतीसाठी प्रत्येक निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने निवडणूक प्रक्रियेबाबत सुस्पष्ट माहिती, योग्य दृष्टिकोन व प्रभावी संवादकौशल्य यांची तयारी करूनच या स्पर्धेत उतरावे, हे अत्यंत आवश्यक आहे. अशा मार्गदर्शन कार्यशाळा शहरांमध्ये होतात; परंतु सर्वच कार्यकर्त्यांना पुणे-मुंबई येथे जाऊन हे मार्गदर्शन घेणे शक्य नसते. त्याकरिता चिपळूण, रत्नागिरीत निवडणूक आणि राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना आमंत्रित केले आहे.
परशुराम एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (चिपळूण) आणि जनजागृती संघ (रत्नागिरी) यांच्या सहयोगाने कार्यशाळा होणार आहे. कोणताही पक्ष असो अथवा अपक्ष ही कार्यशाळा सर्व उमेदवारांसाठी खुली असणार आहे. तज्ज्ञ व्याख्यात्यांच्या मार्गदर्शनातून या कार्यशाळेत उमेदवारांना निवडणूक प्रक्रिया, नामनिर्देशन प्रक्रिया, आचारसंहिता, प्रचार धोरण, जनसंपर्क तंत्र, संवादकौशल्य, आधुनिक समाजमाध्यमांचा वापर, खर्चाचे पारदर्शक नियोजन, प्रचारयंत्रणा आणि स्वयंसेवक व्यवस्थापन कसे करावे याची सखोल माहिती दिली जाणार आहे. कार्यशाळेत जबाबदार नेतृत्वगुण आणि मतदारांशी विश्वासार्ह नाते निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले जाईल.
चौकट
असा होईल कार्यक्रम
१५ सप्टेंबरला अभिरुची हॉटेल, चिपळूण येथे आणि १६ सप्टेंबरला अंबर हॉल, टीआरपी, रत्नागिरी येथे सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत होईल. जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परशुराम एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सचिव डॉ. मीनल ओक आणि जनजागृती संघाचे अध्यक्ष केशव भट यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.