-rat९p३२.jpg-
२५N९०४२१
दामले विद्यालय
---------
दामले विद्यालयास प्रेरणादी पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघटनेने विविध पुरस्कार जाहीर केले. यात दामले विद्यालयास प्रेरणादायी शाळा पुरस्कार व श्रद्धा गांगण यांना आदर्श सक्षम महिला पुरस्कारही जाहीर झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याची पर्यटन शाळा म्हणून घोषित झालेल्या व जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पटाची सरकारी शाळा म्हणून नावारूपास आलेल्या दामले विद्यालय अर्थात् नगर पालिका शाळा क्र. १५ची प्रेरणादायी आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. येत्या २७ ला साताऱ्यात पुरस्कार वितरण होणार आहे.
याच विद्यालयातील क्रियाशील शिक्षिका श्रद्धा गांगण यांना आदर्श सक्षम महिला पुरस्कारही जाहीर झाला आहे. एकाच वर्षी हे दोन्ही पुरस्कार शाळेला प्राप्त झाल्याबद्दल रत्नागिरी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुधाकर मुरकुटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद संसारे व सर्व कार्यकारिणीने अभिनंदन केले.