-rat९p२६.jpg-
२५N९०३९३
गौरीज माळी
-----
टेनिस क्रिकेटसाठी गौरीजची निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : आगामी ७व्या ज्युनियर १० वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडू म्हणून नाचणे-पांडवनगर येथील गौरीज माळी याची निवड झाली आहे. येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी मिलिंद माळी यांचे ते सुपुत्र आहेत.
ऑल इंडिया महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूजला झालेल्या सातव्या अजिंक्यपद टेनिस क्रिकेट स्पर्धा यापूर्वी झाली होती. त्यामध्ये गौरीजने दमदार खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. राज्य संघटनेच्या निवड समितीने जिल्ह्यातील खेळाडूंची निवड महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केली आहे. यांचे नाशिक येथे १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान २ दिवसांचे राष्ट्रीय शिबिर होणार आहे. रत्नागिरी टेनिस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुमीत अणेराव, जिल्हा सचिव सिद्धेश गुरव, संघ मार्गदर्शक रोशन किरडवकर यांचे गौरीजला मोलाचे मार्गदर्शन लाभले.