-rat९p२२.jpg-
२५N९०३८५
रत्नागिरी ः सौरभ रावणंग याला सायकल भेट देताना पालकमंत्री उदय सामंत, राज्य कृषिमूल्य आयोग व कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल.
-----
शेतकरीपुत्र सौरभ रावणंगला सायकलभेट
रत्नागिरी, ता. ९ ः सायकलिंग तसेच रनिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवणारा निवळी येथील सायकलपटू, धावपटू शेतकरीपुत्र सौरभ रावणंग याला राज्य कृषिमूल्य आयोग व कार्यकारी अध्यक्ष (मंत्री दर्जा) पाशा पटेल यांच्या हस्ते रेसर सायकल देण्यात आली. सोबतच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबकडे या सायकलची जबाबदारी देण्यात आली. या सायकलसाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी निधी उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सभासद आणि ३००हून अधिक शेतकरी बांधव उपस्थित होते.