-rat९p३६.jpg-
P२५N९०४२५
लांजा ः वायूसेनेत निवड झालेल्या साहिल सरफरेसोबत कुटुंबातील सदस्य.
-----
साहिल सरफरेची वायूसेनेत निवड
लांजा, ता. ११ ः शहरातील आगरवाडी येथील साहिल सुरेश सरफरे याने भारतीय वायूसेनेचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून ‘मेडिकल असिस्टंट’ या पदावर नियुक्ती मिळवली आहे. बेंगलोर येथे पासिंगआऊट परेडमध्ये त्याने यशस्वी सहभाग नोंदवला. या बॅचमध्ये एकूण ११८ जवानांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
साहिलचे शैक्षणिक जीवनही प्रेरणादायी आहे. त्याने पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण लांजा येथील राणे इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केले. अकरावी व बारावी लांजा हायस्कूलमध्ये विज्ञान शाखेतून पूर्ण केले. गतवर्षी त्याने भारतीय वायूसेनेच्या भरती परीक्षेत सहभाग घेतला आणि संपूर्ण भारतामध्ये पंधरावी रँक मिळवून उत्तीर्ण झाला होता. साहिलने आपले १४ महिन्याचे प्रशिक्षण तीन टप्प्यांमध्ये पूर्ण केले. आता त्याची नियुक्ती पंजाब पाकिस्तान बॉर्डरवर करण्यात आली असून, देशरक्षणाच्या कार्यात योगदान देण्यासाठी लवकरच तो रूजू होणार आहे. पासिंगआऊट परेड सोहळ्यासाठी साहिलचे आई, वडील आणि बहिण बेंगलोरमध्ये उपस्थित होते.