आमदार सामंतांचा
माजळमध्ये सत्कार
लांजा, ता. ९ ः आमदार किरण सामंत यांनी माजळ गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. गावातील नागरिकांनी मांडलेल्या विविध अडचणी, विकासकामे आणि गरजांवर सविस्तर चर्चा करून त्यांचे तत्काळ निराकरण करण्याचे आश्वासन आमदार सामंत यांनी दिले. माजळ गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकही रुपया निधी कमी पडू देणार नाही. रस्ते, पाणी, वीज, शैक्षणिक व सामाजिक सुविधा या सर्व गोष्टींसाठी शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.