swt1013.jpg
90602
मुंबईः ब्युरो व्हिरिटास व सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सेवा सहयोग फाउंडेशनमार्फत
मुंबईत शालेय साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १० : मुंबई (अंधेरी) येथील ब्युरो व्हिरिटास कंपनीच्या सीएसआर फंडातून आणि सेवा सहयोग फाउंडेशनच्या सहकार्याने सोमवारी (ता. ८) कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी ब्युरो व्हिरिटास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलक प्रकाश, फायनान्स डायरेक्टर पायल रुपारेल, हेड ऑफ प्रोक्युरमेंट शांता पुजारी, हेड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मिलिंद पाटील, ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर पुरुषोत्तम देवधर यांच्यासह सेवा सहयोग फाउंडेशनचे संचालक किशोर मोघे, सीनियर प्रोग्राम मॅनेजर दीपाली देवळे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील एकूण ७२ जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना सुमारे ४००० स्कूल बॅग आणि ११३२ विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य किट शाळांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागांतील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, संस्थाचालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
..................
swt1014.jpg
90603
ओझरमः मुख्याध्यापक विनायक जाधव, संजय पवार आदींसह शिक्षक, शिक्षिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
ओझरम तीर्थवाडी शाळेत
शिक्षक, शिक्षिकांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १० : ओझरम तीर्थवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समितीच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधत ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त ओझरम शाळा क्र. १ चे मुख्याध्यापक विनायक जाधव, कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार तसेच ओझरम गावातील तिन्ही शाळांतील सर्व शिक्षक-शिक्षिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कासार्डे विभाग केंद्रप्रमुख शिक्षक संजय पवार यांनी जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले. मुख्याध्यापक जाधव यांनी आपल्या भाषणात, हा पुरस्कार सर्व ग्रामस्थांचा आहे. सर्वांच्या एकजुटीमुळे मला काम करण्यास प्रोत्साहन मिळाले, असे सांगत ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी जितेंद्र राणे, सरपंच समृद्धी राणे, माजी पंचायत सभापती विनायक राणे, दिनेश राणे, गणेश राणे, एल. डी. राणे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदाशिव राणे, नितीन राणे, अशोक राणे, सुरेश राणे, दिव्या राणे, दुर्वा राणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.