swt1016.jpg
90611
सावंतवाडी ः सालईवाडा भट्टीवाडा मंडळाच्या गणपती बाप्पा समोर मोदक अर्पण करताना.
सालईवाडा येथे''श्रीं''ना
सहस्त्र मोदकांचा नैवेद्य
सावंतवाडीः शहरातील हिंदू आणि मुस्लिम तरुणांनी एकत्र येऊन गणेश चतुर्थीचा सण साजरा करत एकतेचा संदेश दिला. या मंडळाचे यंदाचे हे चौथे वर्ष असून, १७ दिवस विराजमान असणाऱ्या या गणराया चरणी संकष्टी चतुर्थी निमित्त भक्तांकडून १ हजार १११ मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. सालईवाडा भट्टीवाडा युवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने १७ दिवस गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. आज संकष्टी चतुर्थी असल्याने बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंडळाचे भक्त संजय वेंगुर्लेकर यांचा मुलगा ऋषी वेंगुर्लेकर दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांनी बाप्पाला एक हजार १११ मोदकांचा नैवेद्य अर्पण केला. या मंडळाच्या माध्यमातून सर्व समाजातील तरुणांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवात सर्व धार्मिक विधी यथासांग पार पाडले जातात. सतरा दिवसांनंतर वाजतगाजत मिरवणुकीने आणि फटाक्यांच्या आतषबाजीत बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. हा उपक्रम समाजातील ऐक्य आणि सलोखा टिकवून ठेवण्याचा एक उत्तम प्रयत्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.