रिक्त पदांची संख्या शून्य करा
उदय सामंत ः रिक्त पदांचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : सर्वच विभागांनी रिक्त पदांची भरती करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करावी. अनुकंपांमधून भरती करण्याबाबत प्राधान्याने काम करावे. नगरपालिका, नगरपंचायत यांनी लाड पागे समितीनुसार रिक्त पदांची भरती करावी. सर्वच विभागांतील रिक्त पदांची संख्या शून्य झाली पाहिजे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री सामंत यांनी सर्वच विभागांची विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अप्पर पोलिस अधीक्षक बाबूराव महामुनी आदी उपस्थित होते. शासनाच्या १५० दिवस कार्यक्रमांतर्गत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी रिक्त पदांबाबत माहिती दिली.