कोकण

दिव्यांग भजन मंडळाच्या पाठीवर कौतुकाची थाप

CD

swt114.jpg
90788
कुडाळः रोटरी क्लबतर्फे दिव्यांग बांधव भजन मंडळातील सदस्यांना छत्र्या व कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या. (छायाचित्रः अजय सावंत)

दिव्यांग भजन मंडळाच्या
पाठीवर कौतुकाची थाप
कुडाळ रोटरीचा उपक्रमः सदस्यांना छत्र्या, कापडी पिशव्यांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ः रोटरी क्लब ऑफ कुडाळतर्फे दिव्यांग बांधव भजन मंडळातील सदस्यांना छत्र्या व कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या.
गणेशोत्सव हा भक्ती, आनंद आणि एकोप्याचा सण आहे. या उत्सवाच्या काळात कुडाळमधील दिव्यांग बांधवांचे भजन मंडळ दरवर्षी घराघरांत जाऊन सुंदर भजनांद्वारे भक्तिमय वातावरण निर्माण करत असते.
पावसाळ्याच्या दिवसांत हे मंडळ आपल्या कष्टाने व श्रद्धेने समाजात आनंदाची उधळण घडवून आणते. त्यांच्या या निःस्वार्थ सेवाभावी कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष मदत करण्यासाठी कुडाळ रोटरी क्लबतर्फे विशेष उपक्रम हाती घेण्यात आला. येथील भैरव मंदिरात आयोजित या कार्यक्रमात दिव्यांग बांधव भजन मंडळातील सदस्यांना छत्र्या व कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या. या माध्यमातून त्यांच्या दैनंदिन सेवेला सहाय्यभूत ठरणारा सामाजिक उपक्रम रोटरी क्लबने राबविला.
या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष राजीव पवार, सचिव मकरंद नाईक, रुपेश तेली, आनंद वेंगुर्लेकर, डॉ. शिल्पा पवार तसेच अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. दिव्यांग बांधव भजन मंडळाच्या सदस्यांनी या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करत रोटरी क्लबचे आभार मानले. समाजातील विविध स्तरांवर सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या हेतूने रोटरी क्लब सातत्याने सामाजिक उपक्रम हाती घेत असल्याचे अध्यक्ष पवार यांनी यावेळी सांगितले.
रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. गणेशोत्सवासारख्या सणाच्या काळात समाजातील उपेक्षित घटकांना मदत करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हीच खरी रोटरीची सेवा परंपरा असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs SA A, ODI: कसोटीत हरले, पण भारत अ संघाने दक्षिण आफ्रिकेवर वनडेत मिळवला दणदणीत विजय ; ऋतुराज गायकवाड पुन्हा चमकला

Crime News : चार मावश्यांनी १७ दिवसांच्या भाच्याला संपवलं, लग्न होत नाही म्हणून अंधश्रद्धेतून धक्कादायक कृत्य

Baramati politics:'बारामतीत अखेरच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायमच राहणार'; नगराध्यक्षपदासाठी चार तर नगरसेवकासाठी 29 अर्ज दाखल

Railways Food Courts: रेल्वेकडून केटरिंग धोरणात मोठा बदल! आता केएफसी आणि मॅकडोनाल्ड्स सारखे फूड ब्रँड स्थानकांवर उघडणार, पण कधी?

Sangamner News:'संगमनेर तालुक्यात आठ दिवसांत १९२ वनराई बंधाऱ्यांची निर्मिती'; ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ प्रभावी, पाणीपातळीत वाढ

SCROLL FOR NEXT