कोकण

उद्योजक निर्मितीचा प्रयोग स्तुत्य

CD

swt115.jpg
90789
कुडाळः प्रथम क्रमांक प्राप्त राखी सावंत, मानसी सावंत, गीता खानोलकर यांचा सन्मान करताना मनीष दळवी. बाजूला गजानन कांदळगावकर, राजीव पवार, अवी वालावलकर, संध्या तेरसे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

उद्योजक निर्मितीचा प्रयोग स्तुत्य
मनीष दळवीः कुडाळात रंगली फ्युचरप्रेन्युअर्स स्पर्धेची अंतिम फेरी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ः आकार फाउंडेशन, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, रोटरी क्लब ऑफ कुडाळ, एमआयडीसी असोसिएशनच्या उद्योजक निर्माण करण्याच्या स्तुत्य प्रयोगाला जिल्हास्तरावर व्यापक रूप देण्यासाठी जिल्हा बॅंक पुढाकार घेऊ, असे प्रतिपादन जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांनी येथे केले.
युवा उद्योजकतेला चालना देणारी, आकार फाउंडेशन आणि संत राऊळ महाराज कॉलेज आयोजित फ्युचरप्रेन्युअर्स स्पर्धेची अंतिम फेरी कुडाळ येथे संत राऊळ महाराज महाविद्यालयात उत्साहात झाली. एकूण पाच संघांनी अंतिम फेरीत स्थान मिळवत आपली सर्जनशीलता व उद्योजकतेची क्षमता सादर केली. या स्पर्धेच्या परीक्षक मंडळामध्ये तीन परीक्षक मोहन होडावडेकर, नितीन वाळके आणि श्री गजानन कांदळगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे बारकाईने परीक्षण केले व त्यातून विजेत्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी इको-फ्रेंडली प्लेट्स, स्किन केअर ॲप, टुरिझम वेबसाईट, फ्लॉवर मेकिंग, आणि इंटिरियर डिझायनिंग यांसारख्या प्रकल्पांचे सादरीकरण केले.
स्पर्धेत प्रथम-राखी सावंत, मानसी सावंत, गीता खानोलकर (७ हजार व सन्मानचिन्ह), द्वितीय हर्षदा शिर्के (५ हजार व सन्मानचिन्ह), तृतीय-संकेत कुलकर्णी, सॅम डिसोजा, यश हडकर, कार्तिक मसुरकर (३ हजार व सन्मानचिन्ह), चतुर्थ-पूर्वा मिसाळ (१ हजार व सन्मानचिन्ह), पाचवा क्रमांक-तनिषा मालवणकर (१ हजार व सन्मानचिन्ह) यांनी यश मिळविले.
बक्षीस वितरण समारंभास जिल्हा बँक अध्यक्ष दळवी, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष नितीन वाळके, आकार फाउंडेशनचे संस्थापक गजानन कांदळगावकर, कुडाळ रोटरी क्लबचे अध्यक्ष राजीव पवार, संत राऊळ महाराज कॉलेजच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, नगरसेविका संध्या तेरसे, महेंद्र गवस, अविनाश वालावलकर, शेखर सामंत आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. कांदळगावकर यांनी आभार मानले. यावेळी संत राऊळ महाराज कॉलेजच्या प्रा. गीताश्री पवार, सुवर्णा निकम, बीएमएस आणि बीएएफच्या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. अनंत वैद्य, सचिन मदने, राजेंद्र केसरकर, शशिकांत चव्हाण, नीता गोवेकर, प्रमोद भोगटे, डॉ. रवींद्र जोशी, राकेश वर्दम, लक्ष्मीकांत परब, प्रज्ञा वालावलकर, गुरू कुरतडकर, हर्षल कदम तसेच जिल्ह्यातील विविध कॉलेजचे प्राध्यापक, बँकेचे अधिकारी उपस्थित होते. कुडाळ एमआयडीसी असोसिएशन, जिल्हा व्यापारी महासंघ आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur heavy rain: सोलापुरातील पावसामुळे देगाव ओढ्याला पूर; शेतीचं मोठं नुकसान, पाच तासांत होत्याचं नव्हतं झालं

Balwan Punia: ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर बजरंग पुनियाच्या यशामागचा आधारस्तंभ हरपला! वडील बलवान पुनिया यांचे निधन

Pune News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले; पुण्यातील घटना

Pune News : प्रभाग रचनेवर संताप; पुण्यात नागरिकांचा घोषणाबाजीचा धडाका

Neelam Gorhe : शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी होण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT