कोकण

-पशुसंवर्धनासाठी विकास अधिकाऱ्यांचे हवे बळ

CD

-Rat११p१५.jpg-
२५N९०८११
मंडणगड : पाळीव श्वानावर उपचार करताना अधिकारी व कर्मचारी.
----
मंडणगडात श्वेतक्रांतीला प्रशासनाचा अडथळा
पशुसंवर्धनासाठी विकास अधिकाऱ्यांचे हवे बळ ; २१ पदे रिक्त, अपुरे कर्मचारी, साधनांचा अभाव
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ११ ः सहकारी चळवळीच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यात दुग्ध उत्पादनात श्वेतक्रांती होत असताना पशुसंवर्धन विभागाची अपुरे कर्मचारी व पशुवैद्यक शास्त्राच्यादृष्टीने आवश्यक साधनांचा अभाव आहे. महत्त्वाची पशुधन विकास अधिकाऱ्यांची तब्बल आठ पदे रिक्त असल्याने पशुसंवर्धनाला बळ मिळालेले नाही.
गेल्या काही वर्षात तालुक्यात दुग्ध उत्पादने व दुधाळ जनावरांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. तालुक्यातील खासगी पशुवैद्यकीय दवाखाने नाहीत अथवा तशी सोय नाही. त्यामुळे पाळीव पशुधनास आजार झाल्यास दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना तालुक्यात उपलब्ध शासकीय सोयीसुविधांवरच अवलंबून राहावे लागते. तालुक्यात मंडणगड, लाटवण, शेनाळे, कुंबळे, दहागाव, म्हाप्रळ, पालवणी, देव्हारे, वेळास हे ९ दवाखाने असून, यातील ६ दवाखाने राज्यशासनाचे तर ३ जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आहेत तसेच मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेच्या माध्यमातून फिरता दवाखाना आहे. यामध्ये एकूण ३३ पदे मंजूर आहेत, यातील केवळ ११ पदे भरण्यात आली आहेत. २१ कर्मचाऱ्यांची पदे शासकीय भरती होत नसल्याने रिक्त आहेत. महत्त्वाचे म्हणजे पशुधन विकास अधिकारी यांची आठ पदे, पशुधन पर्यवेक्षक यांची ७ अशी एकूण १५ महत्त्वाची पदे दवाखाना सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असताना भरली गेलेली नाहीत. पाच शिपायांची पदे रिक्त आहेत.
तालुक्यात सद्यःस्थितीत तालुक्याचे केवळ तीन पशुधन विकास अधिकारी व तीन पशुधन पर्यवेक्षक तालुक्याचा कारभार पाहात आहेत. तालुक्याची डोंगराळ संरचना लक्षात घेता हा आकडा कार्यरत कर्मचाऱ्यांवर जास्तीच्या कामाचा भार टाकणार आहे. पाळीव कुत्रे व मांजर हे प्राणी आजारी पडल्यास वा दुखापतग्रसत झाल्यास दवाखान्यात आणले जातात. गाई, म्हशी, बैल इत्यादी प्राण्यांना आजार झाल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना जागेवर जावे लागते. त्यात बराच वेळ वाया जातो. त्यामुळे कर्मचारी भरतीचा रिक्त अनुशेष तातडीने भरून काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पाळीव पशुधनास गंभीर आजार झाल्यास अथवा तातडीने शस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्यास तशी सोय केवळ तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे. पाळीव पशुधनाचे विविध आजारांचे निदान करण्यासाठी कालसंगत गरजेच्या तांत्रिक साधनांचीही अडचण येते याशिवाय विविध शासकीय योजनांचा प्रचार, प्रसार व प्रशासकीय कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करण्यातही कर्मचाऱ्यांचा वेळ खर्च होतो.

चौकट
तालुक्यातील पशुधन
गाई* ८७४२
म्हशी* ११९८
शेळी* ३१८७
पोल्ट्री* १८८१५
-----
कोट १
रिक्त पदांचा भार इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर येत आहे. तालुक्याची भौगोलिक रचना डोंगराळ असल्याने सर्व गावांपर्यंत पोहोचण्यास तारेवरची कसरत करावी लागते. यामध्ये कर्मचाऱ्यांची दमछाक होते. भरती परीक्षा होत नसल्याने जागा रिक्त आहेत. तालुक्यातील शेतकऱ्याच्या पशुधनाला योग्यवेळी आणि त्वरित सेवा देण्यासाठी अधिकारी कर्मचारी पदे भरणे आवश्यक आहे.
- पूजा शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी, मंडणगड

कोट २
मंडणगड तालुक्याची पशुधन वैद्यकीय सेवा ही परिपक्व नाही. त्यामुळे निश्चितच तालुक्याचे नुकसान होत आहे. उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या आजारात उपचार देणे आवश्यक आहे. केवळ इतर कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहू नये. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास होणारे नुकसान भरून निघणारे नाही.
- भरत यादव, दुग्ध व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Terrorist Module Exposed: मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; पाच राज्यांमध्ये छापे अन् पाच संशयित दहशतवाद्यांनाही अटक!

Mumbai Metro: मुंबईतल्या मेट्रो-३ प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; रिझर्व्ह बँकेसोबत भूखंड विक्रीचा करार पूर्ण

Latest Marathi News Updates Live : मंगळवेढा पोलिसांनी शोधलेले मोबाईल मालकांच्या ताब्यात

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT