कोकण

८४७ ग्रामपंचायतीत १७ रोजी विशेष ग्रामसभा

CD

विशेष ग्रामसभेचे ८४७ ग्रामपंचायतीत आयोजन
जिल्हा परिषदेचा पुढाकार ; बुधवारी समृद्ध पंचायत राज आभियानची माहिती देणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः गावांच्या स्वच्छता, पोषण, आरोग्य, शाश्वत विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन चला, अशी हाक देत राज्यसरकारने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानातील लोकसहभाग वाढावा, ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभांचे आयोजन केले आहे. त्या दिवशीची ग्रामसभा तहकूब होऊ नये यासाठी जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडून कसून तयारी सुरू आहे.
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने विकासासाठी गावांची कार्यक्षमता वाढण्याकरिता १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान स्पर्धात्मक अभियान सुरू होत आहे. सशक्त पंचायतराज संस्था महाराष्ट्र आणि सक्षम महाराष्ट्र हे ध्येय गाठण्यासाठी तब्बल २९० कोटी ३३ लाखांची विशेष तरतूद करून हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शाश्वत विकासाबरोबर स्वच्छता, शिक्षण, पोषण, आरोग्य या क्षेत्रात लोकसहभागातून उत्तम कामगिरीसाठी थेट प्रोत्साहन दिले जाणार आहे. या अभियानातील सहभागी ग्रामपंचायतींना ८ मुख्य घटक विषयांवर स्पर्धात्मक १०० गुणांसाठी मुल्यांकन होणार आहे. अभियानकाळात ग्रामपंचायतींना घरपट्टी, पाणीपट्टी ही क्युआरकोडद्वारे वसुलीसह लोकवर्गणीचे उद्दिष्टे दिले आहे. त्यातून लोकोपयोगी सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. ग्रामपंचायतीने स्वउत्पन्न वाढवण्याबरोबर नळ पाणीपुरवठा योजना आणि पथदिव्यांचे वीजबिल नियमित भरून थकबाकी शून्य ठेवावी लागणार आहे.
गावातील सर्व शासकीय, निमशासकीय संस्थांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग करून लोकसहभागातून पावसाच्या पडणाऱ्या आणि उपलब्ध पाण्याचा ताळेबंद ठेवून त्याच्या व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा लागणार आहे. अपारंपरिक सौरऊर्जेचा वापर, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवणे, प्लास्टिकबंदी, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन यासाठी गावाला यात सर्वोत्तम योगदान द्यावे लागणार आहे.
मनरेगाअंतर्गत विकासकामे, निर्मल शोषखड्डा, जलतारा, विहीर पुनर्भरण, रेनवॉटर हार्वेस्टिंग, विहीर दुरुस्ती, घरकुल आदी कामांना गुणांक मिळणार आहेत तर ग्रामपंचायत, अंगणवाडी आणि शाळांच्या सुविधा सक्षमीकरण, स्मशानभूमी परिसरात सुविधा व्यायामशाळा, धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण, बचतगटांना बँकेमार्फत कर्ज वितरण, लखपतीदीदी, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी या अभियानांत अधिक गुण मिळणार आहेत.
या सर्व बाबींची ग्रामस्थांना माहिती मिळावी, गावात जनजागृती होऊन लोकसहभाग वाढावा, ग्रामस्थांच्या सहयोगातून विविध उपक्रम राबवले जावेत यासाठी १७ रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
---
कोट
जिल्ह्यातील एकही ग्रामसभा तहकूब होणार नाही याचे नियोजन केले आहे. त्यानुसार महिला बचतगटांना निमंत्रण देणे, ग्रामस्थांपर्यंत माहिती पोचवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचा निश्चितच फायदा होईल. शासनाची योजना यशस्वी होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
- सागर पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामविकास
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protests: नेपाळची संसद विसर्जित; सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान

Shiv Sena UBT Demand : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने केली मोठी मागणी!

SSC Exam Form : दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून होणार सुरू

Vasmat Heavy Rain : वसमतला ढगफुटी सदृश्य पाऊस! शेतशिवाराला नद्यांचे स्वरूप; आखाडे गेले वाहून, पाच गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates Live : कात्रज कोंढवा रस्त्यासाठी २२० कोटीचे वर्गीकरण

SCROLL FOR NEXT