कोकण

तर कोकणी शेतकरी होईल स्वयंपूर्ण !

CD

बोल बळीराजाचे---------लोगो

चिवारणीच्या बेटातून वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज तुम्ही ऐकलाय का? ते गीत कोकणच्या विकासाचं का नाही होणार? आपले मार्ग आता स्वयंपूर्णतेचे व्हायला हवे. या लाल मातीत काय पिकेल हे शोधायला हवं. जे विकलंही जाईल आणि सुबत्ता येईल. आता कारणं नाही तर उत्तरं शोधायला हवीत. कोकणात रोजगाराची कमी नाही, प्रश्नांचीही काय कमी? बांबूवर प्रक्रिया होईल तेव्हा होईल; पण हा बांबू टनावर असुद्या नाहीतर नगावर. खरेदी होऊ लागला तरच बांबूच्या नवीन लागवडीला बळ मिळेल.

- rat१२p१४.jpg -
25N91026
- जयंत फडके
जांभूळआड, पूर्णगड, रत्नागिरी
----
...तर कोकणी शेतकरी होईल स्वयंपूर्ण !
कोकणातील बळीराजाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण अशी बांबू परिषद रत्नागिरीत नुकतीच संपन्न झाली. सारी शासकीय यंत्रणा यासाठी काम करताना दिसली. पालकमंत्र्यांचाच पुढाकार असल्याने अगदी मंडणगड ते राजापूरपर्यंत साऱ्या तालुक्यांचे जिल्हा परिषद, महसूल, कृषी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीच सभागृहात गर्दी केली आणि निमंत्रित शेतकऱ्यांनाच बसायला जागा नाही, अशी परिस्थिती आली. त्यात शेतकऱ्यांना तसं काहीच काम नसल्याने अकराची परिषद एक वाजता सुरू झाली तरी माझा बळीराजा काही हटला नाही; पण याचं चीज केलं ते विशेष उपस्थित असलेल्या मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलांच्या भाषणानं..! चळवळीतला माणूस अधिकाराच्या जागेवर गेल्यावर बळीराजाचं दुःख किती परिणामकारकपणे मांडू शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण अनुभवता आलं. शासकीय व्यवस्थेला चिमटे काढत शेतकऱ्यांना आरसा दाखवत त्यांनी बांबूचं कोकणातलं उज्ज्वल भविष्य स्पष्टपणे मांडलं. कोटीच्याकोटी उड्डाणे आता बळीराजाच्या आश्चर्याचा विषय राहिली नाहीयेय. फक्त जमिनीवर बांबू किती पाळं घेतो, ते आता काळंच ठरवेल. तसं चिवारणीचं किंवा चिव्याचं बेट कोकणातल्या माझ्या बळीराजाला नवीन नाही. घराजवळपास एखादं चिवारणीचं बेट असतंच इकडे.. चिव्याची काठी हे काही मुद्दाम लागवड करायचं झाड नव्हतंच कधी.. माड, पोफळ, फणस, आंबा, काजू तसा चिवा हवाच परसवात; पण त्याचेही कधी पैसे होतील, हे ध्यानीमनीही नव्हतं. गुढीला काठी विकत आणायची ही कल्पनाच नाही इकडे कोणाच्या डोक्यात... आपल्याकडे नसली तर शेजाऱ्याकडून मागून आणण्यापर्यंतच व्यवहार होता. ‘किती रुपये?’ हा प्रश्न जरी तोंडातून निघाला तरी त्याच काठीच्या शेंडक्याचा प्रसाद मिळायचे दिवस होते ते...दरवर्षी नवीन चिवा तोडायला परवडायचा तेव्हाचं म्हणतोय मी..! ‘कालाय तस्मै नमः’ या सदरात एकच काठी अनेक वर्ष चालतेय. पीव्हीसी पाईप नाही उभा झाला म्हणजे मिळवली....तर चिवा हे उत्पन्नाचं साधन होऊ शकतं, हे माझ्या एका हितचिंतक मित्रानं माझ्या डोक्यात भरवलं. त्यालाही आता काही वर्ष झाली; पण तळकोकणात मुद्दाम केलेली लागवड बघितली आणि मनाचा हिय्या करून दोनशे कोंब विकत आणले. हे जरा अतिच होतंय हे माहित असूनही व्यवस्थित माहिती घेऊन लागवड केली. आता मात्र हे आधीच करायला हवं होतं, असं वाटतंय.
बांबू कोकणात फक्त पावसाच्या पाण्यावर छान होतो; पण पाशाजींनी बरोबर आणलेल्या करपे नावाच्या हिऱ्यानं जे सादरीकरण केलं त्यांनी उपस्थित अवाक् झाले. आता बांबूपासून कोळसा, दागिने, फर्निचर, इथेनॉल, बायोडिझेल अनेक प्रत्यक्ष होणाऱ्या गोष्टी कोकणातील शेतकऱ्यांसाठी संधीची नवीन दारं किलकिले तरी करतोय. खरंतर, शंभर टक्के अनुदान, रोहयो, मनरेगात आंबा-काजूची झालेली लागवड पाहता मोकळे डोंगर फार शिल्लक नाहीत. त्याचबरोबर आता एकाच सातबाऱ्यावरची दहा नावं, आंतरपिक म्हणून योजनेत बांबूचा सहभाग आणि मुख्य म्हणजे वानर-माकडांचा कोंबच खायचा छळवाद, हे यक्षप्रश्न आहेत; पण परिषदेतील चर्चेत तरी बांबूपासून मागणी भरपूर आहे. आंबा, काजू, भात, नारळ हेच उत्पन्नाचे साधन हा विचार थोडा बाजूला ठेवून अन्य मार्गही चोखाळायला हवे. असा थोडा सकारात्मक विचार तरी दिसला. उत्पन्नाचे विविध पर्याय असतील तरच कोकणातील शेतकरी तग धरू शकतो, हेही तितकंच खरं!
कोकणातला माझा बळीराजा ताकही फुंकून पितो. जगभर फिरणाऱ्या पाशाजींना क्षितिजही लांबच दिसणार; पण सबसिडीत गुंतून अशा योजनांचे भविष्य हातात पोकळ बांबू घेण्यापर्यंत येते. हे खरंच की, बांबूपासून उत्पादन, प्रक्रिया संधी अमर्याद आहेत फक्त आरसा थोडा स्वच्छ व्हायला हवा इतकंच..!!

(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protests: नेपाळची संसद विसर्जित; सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान

Shiv Sena UBT Demand : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने केली मोठी मागणी!

SSC Exam Form : दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून होणार सुरू

Vasmat Heavy Rain : वसमतला ढगफुटी सदृश्य पाऊस! शेतशिवाराला नद्यांचे स्वरूप; आखाडे गेले वाहून, पाच गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates Live : न्यायाधीशांच्या कारला आग, सुदैवाने इजा नाही

SCROLL FOR NEXT