- rat१२p४.jpg-
२५N९०९९०
रत्नागिरी ः विद्यार्थ्यांचा सत्कार करताना सुरेश भायजे.
गुणवत्तेत धामापूर अव्वल
सुरेश भायजे ः उत्कर्ष मंडळातर्फे गुणगौरव कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १२ ः संगमेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिली तर धामापूर गाव अव्वल ठरेल, असा विश्वास बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भायजे यांनी व्यक्त केला.
ते उत्कर्ष तरुण मंडळ धनावडेवाडी येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते. या वेळी ते म्हणाले, धामापूरतर्फे संगमेश्वर हा ६ हजार लोकवस्तीचा गाव आहे. या गावात २००५ ला माजी सरपंच कै. परशुराम उर्फ भाऊ शिगवण व सामाजिक कार्यकर्ते कै. गणपत भायजे यांनी कुणबी समाजाचा शैक्षणिक, नोकरीविषयक प्रत्येक कुटुंबात जाऊन सर्वे केला होता. गावात कुणबी समाजाचा एकही शासकीय कर्मचारी सापडला नाही. बारावी येथे शिकणारे बोटावर मोजण्याएवढीच मुलं होती; मात्र पदवीधर एकही मूल कुणबी समाजात सापडले नव्हते. आता २० वर्षानंतर गावात शेकडो मुले पदवीधर झालेली आहेत. याच गावातील भडवळेवाडीतील रोहन शिगवण यांनी पुणे येथे नोकरी करताना एमपीएससी परीक्षेत यश मिळवले. तो १८व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे. याच गावातील पडयेवाडीतील आर्या पडे हिने दहावीत ९९ टक्के गुण मिळवले आहेत. त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे, असे भायजे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.