कोकण

आधी माहिती द्या; मगच हरकती मागवा

CD

91054

आधी माहिती द्या; मगच हरकती मागवा

डॉ. जयेंद्र परुळेकर ः शक्‍तिपीठ महामार्गसंदर्भात भूमिका

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः मुंबई-गोवा महामार्गासारख्या भूसंपादन प्रक्रियेत मिळालेली भरपाई पाहता, शक्‍तिपीठ महामार्गासाठी नाममात्र भरपाई मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रथम महामार्गाचा तपशीलवार आराखडा, नुकसानभरपाई व पर्यावरणीय आघाताबाबतची प्रथम माहिती द्या आणि त्यानंतरच हरकती मागवा, अशी भूमिका शक्‍तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
श्री. परुळेकर म्हणाले, ‘गणेशोत्सवासारख्या सणासुदीच्या काळातच हरकती नोंदवण्यासाठी नोटिसा देण्यात आल्याने लोकांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ द्यावी. आराखडा, लांबी-रुंदी, बोगद्यांचा तपशील, भूसंपादन होणाऱ्या जमिनी याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती न दिल्याने लोकांची दिशाभूल होत आहे. भूसंपादन कायदा १९५५ नुसार प्रभावित शेतकऱ्यांना नाममात्र भरपाई मिळण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गासाठी प्रति गुंठा चार लाख रुपये मिळाले होते; मात्र शक्‍तिपीठ महामार्गासाठी अशी भरपाई मिळेल का? याबाबत संभ्रम आहे. बागायती, जिरायती जमिनी व झाडांसाठीचे दर निश्चित नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.’
ते पुढे म्हणाले, ‘एक लाख दहा हजार कोटींचा हा प्रकल्प जैवविविधतेच्या संवेदनशील भागातून जाणार असल्याने पर्यावरणीय अहवाल जनतेसाठी उपलब्ध करून द्यावा. १३ गावांतून महामार्ग जाणार असला, तरी एकही एक्झिट पॉईंट नसल्याने स्थानिकांना थेट फायदा होणार नाही. रोजगार, आरोग्य व पायाभूत सुविधांपेक्षा सरकार महामार्गालाच प्राधान्य देत आहे. स्थानिकांची प्रमुख मागणी मुंबई-गोवा महामार्ग व सागरी महामार्ग पूर्ण करण्याची आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर-रत्नागिरी महामार्ग आठ पदरी करून तो कोकणाशी जोडण्याचा पर्याय सुचवला आहे, ज्यामुळे शक्तीपीठ महामार्गाची गरजच उरणार नाही.’’
------------
सावंतवाडी, बांदा येथे लवकरच मोठी सभा
महामार्गासंदर्भातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लवकरच सावंतवाडी किंवा बांदा येथे मोठी सभा होणार आहे. यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री आमदार बंटी पाटील, माजी खासदार विनायक राऊत, आणि माजी आमदार वैभव नाईक सहभागी होणार आहेत. या सभेत १३ गावांतील लोकांना एकत्र आणून योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे, असे डॉ. परुळेकर यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protests: नेपाळची संसद विसर्जित; सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान

Shiv Sena UBT Demand : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने केली मोठी मागणी!

SSC Exam Form : दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून होणार सुरू

Vasmat Heavy Rain : वसमतला ढगफुटी सदृश्य पाऊस! शेतशिवाराला नद्यांचे स्वरूप; आखाडे गेले वाहून, पाच गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates Live : कात्रज कोंढवा रस्त्यासाठी २२० कोटीचे वर्गीकरण

SCROLL FOR NEXT