rat12p23.jpg
91058
रत्नागिरी ः खेडशी परिसरात फिरणारा गवारेडा.
rat12p24.jpg
N91062
गवारेड्याने नासधूस केलेली भातशेती.
----------------
खेडशी परिसरात गवारेड्याचा उपद्रव
भातशेतीची नासाडी; दिवसाही दर्शन
रत्नागिरी, ता. १२ : शहरालगत असलेल्या खेडशी गावातील डफळचोळवाडीत गवारेड्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत. महिनाभरापासून हे गवे रात्री-अपरात्री शेतात घुसून भातशेती व फळबागांचे मोठे नुकसान करत आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दिवसाढवळ्याही गव्यांचा कळप गजबजलेल्या वस्तीजवळही फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.
या हंगामातील भातशेती, पिकांचे आणि बागांचे नुकसान होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. खेडशी गावातील शेतकरी विश्वास खापरे यांच्या भातशेतीचे गव्यांनी नुकसान केले आहे. खेडशी चाँदसूर्या ते पानवलफाटा या भागात गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या गव्यांच्या कळपाचे दर्शन या भागात मिऱ्या-नागपूर महामार्गालगतच्या परिसरातील रहिवासी, महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना होत आहे. या परिसरात फिरणाऱ्या गव्यांच्या कळपाबाबत वनविभागाला ग्रामस्थांकडून खबर देण्यात आली आहे. तरीही त्यांच्या बंदोबस्ताबाबत कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.