rat१२p३०.jpg-
९१११७
एसटी
एसटीला गणराय पावले,
साडेपाच कोटींचे उत्पन्न
गणेशोत्सवात ३३०७ फेऱ्या; भाविकांची सोय
रत्नागिरी, ता. १२ : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) रत्नागिरी विभागाला गणराय पावले आणि तब्बल ५ कोटी २३ लाख ६३ हजार ९३५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गणेशभक्तांना मुंबईतून येण्यासाठी आणि उत्सव संपल्यानंतर परत जाण्यासाठी अशा एकूण ३३०७ एसटी फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले तसेच उत्सव कालावधीतही गणेशभक्तांनी एसटीचा प्रवासासाठी भरपूर उपयोग केला. यामुळेच एसटीच्या उत्पन्नात गणरायाने दान टाकले आहे.
मुंबई, बोरिवली, ठाणे आदी भागांतून लाखो कोकणकर गणेशभक्त जिल्ह्यात दाखल झाले. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाने सुरक्षित वाहतुकीचे शिवधनुष्य पेलले. अपूर्ण असलेला महामार्ग, खड्डेमय रस्ते यातून गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी महामंडळाने विशेष उपाययोजना केल्या होत्या. चालक, वाहकांना सूचना दिल्या होत्या. ग्रुपबुकिंगसाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली. सर्व आरक्षण ऑनलाइन माध्यमातून पार पडले होते. त्यामुळे एसटीला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
मुंबईतून येण्यासाठी जादा वाहतूक करण्यात आली. यामध्ये मंडणगड ६९, दापोली ७६ फेऱ्या, खेड ३६, चिपळूण १५५, गुहागर ५६, देवरूख ९१, रत्नागिरी ४२, लांजा ४८, राजापूर ४४ अशा ६१७ फेऱ्या सोडण्यात आल्या. या माध्यमातून रत्नागिरी विभागाला ७४ लाख १३ हजार ८३० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. यानंतर गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या २६९० फेऱ्या सोडल्या. त्यातून एसटीला ४ कोटी ४९ लाख ५० हजार १०५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामध्ये मंडणगड १७८, दापोली ३१३, खेड २५९, चिपळूण ३९१, गुहागर ४१९, देवरूख ३८६, रत्नागिरी २७३, लांजा २२१, राजापूर २५० फेऱ्या सोडण्यात आल्या, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
-----------
चौकट
*आगार*फेऱ्या*उत्पन्न (रुपयांत)
*मंडणगड*२४७*२५,९२,३३१
*दापोली*३८९*४६,९८,४९४
*खेड*२९५*४२,१९,५४९
*चिपळूण*५४६*६३,१६,७७५
*गुहागर*४७५*९५,९३,४७१
*देवरूख*४७७*८०,७६,८०१
*रत्नागिरी*३१५*४३,११,७०६
*लांजा*२६९*५३,२७,३७७
*राजापूर*२९४*७२,२७,४३१
------------------------
*एकूण*३३०७*५,२३,६३,९३५
कोट
कोकणात सर्वात मोठा सण गणेशोत्सव व शिमगोत्सव. सर्वाधिक वाहतूक गणेशोत्सवात होते. कारण, कोकणकर मुंबईकर या उत्सवात हमखास येतात. त्यामुळे रा. प. महामंडळाच्या मुंबई प्रादेशिक विभाग व रत्नागिरी विभागातर्फे फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला व महामंडळाला बाप्पा पावला.
- प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.