कोकण

-खेडमधील घराला भीषण आग

CD

-rat१२p२६.jpg-
२५N९१०८७
खेड ः आग अटोक्यात आणताना अग्निशमन दलाचे जवान.
-----------
खेडमधील घराला भीषण आग
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १२ : शहरातील कातळआळी येथे शुक्रवारी (ता. १२) पहाटे लागलेल्या आगीत दोनमजली कौलारू घराचे मोठे नुकसान झाले. पहाटे सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने जीवितहानी टळली.
घरमालक किशोर चंद्रकांत विचारे यांच्या घरातील किचनमधील फ्रिज अचानक शॉर्टसर्किटमुळे जळाल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची तीव्रता वाढत असताना घरातील तीन भरलेले गॅस सिलिंडर तत्काळ बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा स्फोट होऊन होणारा अनर्थ टळला. आगीत किचनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून, घराचेही नुकसान झाले आहे. खेड पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. या मोहिमेत फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहनचालक गजानन जाधव, तसेच साहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणव घाग आणि सूरज शिगवण यांनी विशेष प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elphinstone Bridge : मुंबईतील एलफिस्टन पुलावर अखेर हातोडा

Pune ZP : राज्यामध्ये ३४ ठिकाणी अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; पुणे ‘झेडपी’साठी खुला प्रवर्ग, सतरा ठिकाणी महिलांसाठी आरक्षण

Karnataka accident during Ganesh Visarjan: कर्नाटकात भीषण दुर्घटना! गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला; आठ जणांचा मृत्यू

Rafale fighter jets India: आता शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या 'राफेल' लढाऊ विमानांची भारतात निर्मिती होणार!

Virar News : आंतरराष्ट्रीय किर्तीचे बॅलेनृत्य कलाकार नरेश नारायण उसनकर यांचे निधन

SCROLL FOR NEXT