कोकण

खासकीलवाडा जिल्हा परिषद शाळेचे ‘सवंगडी’ एकवटले

CD

91389

खासकीलवाडा जिल्हा परिषद शाळेचे ‘सवंगडी’ एकवटले

स्नेहमेळावा थाटात; शाळा प्रगतीसाठी माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः खासकीलवाडा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ४ ही ऐतिहासिक शाळा यंदा दीडशे वर्षांची सुवर्ण कामगिरी साजरी करत आहे. या अविस्मरणीय पर्वानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा आज मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन केली. संघटनेच्या अध्यक्षपदी सीताराम गावडे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी डॉ. कांचन दत्ता विर्नोडकर, सचिवपदी सुधीर धुमे,
खजिनदारपदी माजी नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्यासह २१ सदस्यीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
मुख्याध्यापिकांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देताना त्यांनी माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. संपूर्ण राज्यभर जिल्हा परिषद शाळा एकामागोमाग बंद पडत असताना, खासकीलवाडा शाळा आजही दिमाखात उभी आहे. या शाळेत आजही पहिली ते सातवीपर्यंत तब्बल २०० विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ‘पर्यटन शाळा’ हा किताब शाळेने पटकावला आहे. राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी विद्यार्थी सुधीर धुमे यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, या शाळेमुळेच आपण घडलो, असे भावनिक उद्गार काढले. माजी नगरसेवक उमाकांत वारंग, सुधीर पराडकर, विनायक पराडकर, समितीचे अध्यक्ष गावडे यांनीही शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. या शाळेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांनी आज डॉक्टर, वकील, प्रशासक, पत्रकार अशा विविध क्षेत्रांत देशभरात आपले स्थान निर्माण केले आहे. आता एकत्र येऊन शाळेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा संकल्प आहे, असे त्यांनी सांगितले. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी नव्या अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या स्नेहमेळाव्यात शाळेसाठी माजी विद्यार्थी एकवटलेले पाहून उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
---------
नवी कार्यकारिणी अशी
अध्यक्ष-सीताराम गावडे, उपाध्यक्ष-कांचन विर्नोडकर, सचिव-सुधीर धुमे, सहसचिव-संतोष तळवणेकर, खजिनदार-बाबू कुडतरकर, सदस्य-विनायक पराडकर, विलास सावंत, सुधीर पराडकर, नंदू विचारे, प्रशांत विनोडकर, शेखर पेडणेकर, महेश सारंग, महेश पुरब, उमाकांत वारंग, मीरा सावंत, गीला रेडकर, आरती कुंभार, प्रियांका परब, शैलेश नाईक, महेश पालव, लक्ष्मी धारगळकर, संजू परब (माजी नगराध्यक्ष).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल; मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबतचे 'ते' वक्तव्य भोवले

माेठी बातमी! 'श्रीगोंदेत खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण'; अडीच कोटीची मागणी करत ३० लाख स्वाकारले, जिल्ह्यात खळबळ

IND vs PAK, Asia Cup: पाकिस्तानने टॉस जिंकला, पण भारताच्या मनासारखा निर्णय घेतला; पाहा प्लेइंग - ११

Accident News: भीषण अपघात! हरिद्वारहून परतणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात, ७ जणांचा मृत्यू

Leopard Terror : 'नागराळच्या शिवारात बिबट्या आढळल्याने शेतकऱ्याचा जीव टांगणीला'; मुक्तसंचारामुळे सीमेवरील गावात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT