rat14p23.jpg-
91429
डेरवणः मुलींच्या सामन्याची नाणेफेक करताना माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत.
सावर्डे, खेर्डी, आकलेतील संघांची भरारी
तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १५ ः चिपळूण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात मुलांमध्ये गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय सावर्डे तर मुलींच्या गटात न्यू इंग्लिश स्कूल खेर्डी चिंचघरी सती या संघानी विजेतेपद पटकावले. तर १७ वर्षांखालील गटात मुलांमध्ये आकले येथील मोहन विद्यालयाने आणि मुलींच्या गटात चिपळूण युनायटेड इंग्लिश स्कूलने विजेतेपदावर मोहर उमटवली. या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट क्रीडा संकुलात झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन उपविभआगिय अधिकारी प्रकाश बेले, श्रीकांत पराडकर, चिपळूण तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राकेश खांडेकर, क्रीडा समन्वयक समीर कालेकर, प्रतीक मोहिते यांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेला माजी कृषिमंत्री व विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. त्याने खेळाडूंशी हितगुजही केले. त्यांच्यासोबत वालावलकर ट्रस्टचे विकास वालावलकर व क्रीडा संकुलाचे संचालक श्रीकांत पराडकर हे उपस्थित होते. स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात मुलांमध्ये गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय सावर्डे विजयी ठरले असून सुमन विद्यालय टेरव उपविजयी आहे. युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणला तिसरा क्रमांक मिळाला. मुली गटात न्यू इंग्लिश स्कूल खेर्डी चिंचघरी सती संघ विजयी तर, युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण उपविजयी ठरला आहे. वसंत शंकर देसाई माध्यमिक विद्यालय असुर्डे आंबतखोल येथील युनायटेड इंग्लिश स्कूलने तिसरा क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील गटात मुलांमध्ये आकले येथील मोहन विद्यालय विजयी, कोकरे येथील जनता माध्यमिक विद्यालय उपविजयी आणि गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय सावर्डे तिसरा क्रमांक मिळाला. मुली गटात युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण विजयी, गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय सावर्डे उपविजयी आणि सुमन विद्यालय टेरवने तिसरा क्रमांक पटकावला. १९ वर्षांखालील गटात मुलांमध्ये खेर्डी चिंचघरी सती स्कूल विजयी झाले असून गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय सावर्डे उपविजयी ठरले आहे. आगवेकर माध्यमिक विद्यालय अलोरेने तिसरा क्रमांक पटकावला. मुली गटात आनंद पवार ज्युनिअर कॉलेज खेंडने विजेतेपद पटकावले. न्यू इंग्लिश स्कूल खेर्डी चिंचघरी सती संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असून तृतीय क्रमांक डी. बी. जे. कॉलेजला मिळाला.