91473
वेंगुर्ले ठाकरे गट नवरात्रौत्सव
समितीच्या अध्यक्षपदी निकम
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १४ ः तालुका ठाकरे शिवसेना सार्वजनिक नवरात्र उत्सव समिती अध्यक्षपदी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांची निवड करण्यात आली. यावेळी नवरात्र उत्सव समिती गठित करण्यात आली.
ठाकरे शिवसेनेच्या तालुका मध्यवर्ती कार्यालयात तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांच्या उपस्थितीत सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करण्यासंदर्भात समिती निवडीची बैठक पार पडली. यावेळी नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निकम, उपाध्यक्षपदी उपतालुका प्रमुख संजय गावडे, सचिव शैलेश परुळेकर, खजिनदार अजित राऊळ, सहखजिनदार गजानन गोलतकर तर सांस्कृतिक कमिटी प्रमुखपदी पंकज शिरसाट व वैभव फटजी यांची निवड करण्यात आली. समितीच्या सल्लागारपदी तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, माजी नगरसेवक तुषार सापळे, ठाकरे सेनेच्या सावंतवाडी विधानसभा महिला आघाडी प्रमुख सुकन्या नरसुले, कोमल सरमळकर, तालुका महिला आघाडी प्रमुख साक्षी चमणकर, उभादांडा सरपंच नीलेश चमणकर, सुहास मेस्त्री, कारमेलिन फर्नांडिस, जस्मिन फणसोपकर, राजश्री मर्ये, अपेक्षा बागायतकर, नम्रता कुर्ले, मिलाग्रीन फर्नांडिस, सुयोग चेंदवणकर व रेकस परेरा यांची निवड करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.