‘डीजीके’च्या विद्यार्थी सचिवपदी जाधव
रत्नागिरी ः भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी सचिवपदी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा दुर्गेश जाधव हा निवडून आला. द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेची गौरवी ओळकर हिची विद्यार्थी उपसचिव म्हणून निवड झाली. महाविद्यालयातर्फे प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, कला शाखा प्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. राखी साळगावकर, विज्ञान शाखा प्रमुख प्रा. वैभव घाणेकर, निवडणूक साक्षरता मंचचे प्रमुख प्रा. विनय कलमकर यांनी अभिनंदन केले.