rat१५p१.jpg-
२५N९१६१८
रत्नागिरी ः घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रथम क्रमांकाला गौरवताना मंत्री उदय सामंत सोबत मान्यवर.
युवापिढी जपतेय कोकणी संस्कार
उदय सामंत ः गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः येथील युवापिढी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणी संस्कार जपण्याचा प्रयत्न करत आहे. या संस्कारांना, त्यांच्यातील कलेला जपण्यासाठी सजावट स्पर्धा व बालमूर्तिकारांसाठी गणेशमूर्ती घडवण्याची स्पर्धा घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे निःस्वार्थ कार्य कांचन मालगुंडकर करत आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२५च्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम येथील जयेश मंगल कार्यालयात झाला. या कार्यक्रमाला अभिनेता वैभव मांगले, अभिनेता पॅडी तथा पंढरीनाथ कांबळे, अभिनेत्री वीणा जामकर या सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली.
स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त आशिष वाडकर यांना १५ हजार रु. व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यांनी श्री देव भैरी मंदिर देखावा केला होता. द्वितीय क्रमांक प्राप्त राहुल पाडावे व एकता परिवाराचा १० हजार रु. व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव केला गेला. त्यांनी संत एकनाथ महाराज देखावा केला होता. तिसरा क्रमांक संतोष कुड यांच्या रेड्यामुखी वेद, संत ज्ञानेश्वर देखाव्याला मिळाला आहे. त्यांना ६ हजार रु. व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच सुबक गणेशमूर्तीसाठी साईराज वाडकर, वामन सुवारे याचबरोबर विशेष उल्लेखनीय, उत्तेजनार्थ व प्रोत्साहनपर पारितोषिकप्राप्त विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.