कोकण

संक्षिप्त

CD

- rat१६p२.jpg-
25N91909
चिपळूण ः सौरभ कुलकर्णी याचा सत्कार करताना आमदार शेखर निकम

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातून
सौरभ कुलकर्णी झाला एमटेक्
चिपळूण ः शहराजवळील कळंबस्ते येथील सौरभ कुलकर्णी यांनी पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातून प्रथम श्रेणीत एमटेक् पदवी संपादन केली आहे. त्यांचे आमदार शेखर निकम यांनी अभिनंदन केले. सौरभ उद्योजक रवींद्र कुलकर्णी यांचा मुलगा. २९ ऑगस्ट रोजी झालेल्या पदवीदान समारंभात सौरभला एमटेक् ही पदवी प्रदान करण्यात आली. शिक्षणाबरोबरच कुटुंबाचा व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारीही पार पाडत सौरभने केलेल्या मेहनतीला अखेर यश मिळाले. या प्रसंगी खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, कळंबस्तेचे सरपंच विकास गमरे, आदिल मुकादम, सुचिता कुलकर्णी, साक्षी कुलकर्णी, विठ्ठल कुलकर्णी, शुभम कुलकर्णी आदी परिवारातील सदस्य उपस्थित होते.

गुहागरात राष्ट्रवादी स्वबळासाठी सज्ज
गुहागर ः गुहागर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष साहिल आरेकर यांच्या नेतृत्वाखाली शृंगारतळी जिल्हा परिषद गटाची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गटातील विकासकामे आणि येणाऱ्‍या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. खासदार सुनील तटकरे निधीतून मोठ्या प्रमाणात विकासकामे गुहागर तालुक्यात झाली आहेत. शृंगारतळी जिल्हा परिषद गटात भरपूर कामे झाली आहेत. त्यामुळे येणाऱ्‍या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. नेत्यांच्या निवडणुकांमध्ये महायुती होते. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका महायुती म्हणूनच व्हाव्यात, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे; परंतु उद्या महायुती झाली नाही तरी तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर तालुका सचिव संतोष जोशी, तळवली पंचायत समिती गण अध्यक्ष आतिष हातिसकर, तालुका उपाध्यक्ष श्रीधर बागकर, तुषार सुर्वे, दीपक शिरधनकर, सुनील मते उपस्थित होते.


वेळणेश्वर महाविद्यालयात विद्यार्थी स्वागत समारंभ
गुहागर : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे नाना फडणवीस सभागृहामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम व द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ समितीच्या सदस्यांना कार्यक्रमात विशेषतः आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या सखोल ज्ञानाचा आणि व्यावहारिक अनुभवाचा लाभ व्हावा, हा यामागचा हेतू होता. या सदस्यांना दरवर्षी प्रत्येक सेमिस्टरला आमंत्रित करून विभागवार विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व बौद्धिक क्षितिज विस्तारास मोठी मदत होत असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. या वेळी माजी विद्यार्थ्यांचा लघुचित्रफीत सादरीकरणही करण्यात आले. विद्याप्रसारक मंडळ, ठाणेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला, केवळ परीक्षार्थी विद्यार्थी न राहता सजग व सुजाण नागरिक बना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT