कोकण

एकाच वेळी ८० विद्यार्थ्यांबरोबर खेळले बुध्दीबळ

CD

- rat१६p११.jpg-
२५N९१८३३
रत्नागिरी ः सर्वंकष विद्यामंदिरच्या विश्वस्त मीना गद्रे आणि मुख्याध्यापिका मोनिका जयस्वाल यांनी बुद्धिबळाची पहिली चाल खेळून उपक्रमाचे उद्‍घाटन केले.

एकटे शरद वझे, प्रतिस्पर्धी ८० विद्यार्थी!
अनोखी बुद्धिबळ स्पर्धा ; सर्वकष विद्यामंदिरात रंगला खेळ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : मुंबईतील चॅलेंजर चेस अॅकॅडमीचे संस्थापक आणि अध्यक्ष शरद वझे यांनी रत्नागिरी येथील सर्वंकष विद्यामंदिरात एक अनोखा उपक्रम राबवला. सायमलटेनिअस चेस प्ले या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात ते ८०हून अधिक विद्यार्थ्यांबरोबर एकावेळी बुद्धिबळ खेळले.
सर्वंकष विद्यामंदिरामध्ये कार्यक्रमाचे उद्‍घाटन शाळेच्या विश्वस्त मीना गद्रे आणि मुख्याध्यापिका मोनिका जयस्वाल यांनी बुद्धिबळाची पहिली चाल खेळून केले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी बुद्धिबळातील अनेक बारकावे समजून घेतले. आजवर वझे यांनी देशातील ८ राज्यांमधील तब्बल १० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांबरोबर बुद्धिबळ खेळले असून, त्यांच्या उपक्रमातून अनेक विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाविषयीची गोडी निर्माण झाली आहे. सर्वंकष विद्यामंदिरामध्ये काल राबवलेल्या अनोखा उपक्रमात वझे हे ८०हून अधिक विद्यार्थ्यांबरोबर एकाचवेळी बुद्धिबळ खेळले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता तसेच आपल्या बुद्धीची ताकद आजमावली. प्रत्येक खेळाडूला त्यांच्या कामगिरीनुसार अ, ब, क अशा श्रेणी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाविषयी आणखी उत्सुकता निर्माण झाली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना बुद्धिबळाची आवड निर्माण होऊन भविष्यात त्यांनी स्पर्धात्मक स्तरांवर आपली छाप सोडावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
----
कोट
विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहता सर्वंकष विद्यामंदिर हे बुद्धिबळाचे महत्त्वाचे केंद्र बनू शकते. दररोज काहीवेळ सराव केला तर विद्यार्थी यात निपुण होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी सातत्याने सराव करून स्पर्धांमध्ये भाग घ्यावा व आपली गुणवत्ता सिद्ध करावी.
- शरद वझे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Hashmi: इमरान हाशमीचा ठाकरे गटात प्रवेश! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना झटका, मिरा भाईंदरवर लक्ष!

Nashik Accident : भीषण! नाशिक-गुजरात महामार्गावर कार-ट्रकची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Kolhapur Fraud Tantrik : कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर..., चुटकी वाजवून भूतबाधा करणाऱ्या मांत्रिकाचा कारनामा उघड; जिल्ह्यावर वचक ठेवायचां प्रयत्न...

Type 5 Diabetes Global Recognition: मधुमेहाच्या नव्या प्रकार; ‘टाइप ५’ मधुमेहाला आता जगभर अधिकृत मान्यता

राग, निराशा अन्‌ हतबलता वाढतेय! ISL सुरू करण्यासाठी भारतीय फुटबॉलपटूंची आर्त हाक...

SCROLL FOR NEXT