कोकण

ख्रिश्चन असोसिएशनमार्फत चराठे शाळेत साहित्य वाटप

CD

swt167.jpg
91869
चराठे ः पीएमश्री शाळेत ख्रिश्चन असोसिएशनतर्फे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

ख्रिश्चन असोसिएशनमार्फत
चराठे शाळेत साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १६ः सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशन, सावंतवाडी शाखेतर्फे चराठे पीएमश्री शाळा क्र. १ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी चराठा सरपंच प्रचिती कुबल, उपसरपंच राजन परब, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश परब, शिक्षणतज्ज्ञ दिगंबर पावसकर, ख्रिश्चन असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अँथोनी डिसोजा, सचिव इलियास गोम्स, सदस्या सिल्व्हिया फर्नांडिस, रेचल डिसोजा, युवा सामाजिक कार्यकर्ते क्लेटस फर्नांडिस, मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर, शिक्षिका आदिती चव्हाण, अमिषा कुंभार, धनदा शिंदे, अंगणवाडी सेविका निकिता राणे आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्या सावंतवाडी शाखेच्या या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले. मुख्याध्यापिका पेडणेकर यांनी शाळेत साहित्य वितरण केल्याबद्दल असोसिएशनचे आभार मानले.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT