म्हापण येथे सोमवारपासून
नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १६ः येथील उत्साही मित्र मंडळातर्फे नवरोत्रोत्सवानिमित्त म्हापण-पाट बाजारपेठ, पिंपळपार येथे सोमवार (ता.२२) पासून ३ ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
होणारे कार्यक्रम असेः २२ ला देवीचे आगमन, पूजन, आरती, ग्रामस्थांची भजने तसेच दांडिया-गरबा, २३ ला अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, म्हापण-वेंगुर्ले यांचे दशावतार नाटक, २४ ला रात्री ९ वाजता खुल्या व ग्रामीण रेकॉर्ड डान्स (अनुक्रमे पारितोषिकेः खुला गट-४०००, ३०००, २०००. ग्रामीण गट ः ३०००, २०००, १०००) सर्व विजेत्यांना कायमस्वरूपी चषक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठी इच्छुकांनी आगावू नाव नोंदणी करावी. २५ ला रात्री ९.३० वाजता ‘तारका २०२५ – नृत्यांचा सुरेख प्रवास’ (चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ), २६ ला रात्री ८ वाजता खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा (अनुक्रमे पारितोषिके ः ७०००, ५०००, ३०००), २७ ला रात्री ९.३० वाजता ‘कोकणचो शिमगो’ (विलास मेस्त्री ग्रुप, नेरूर), २८ ला सायंकाळी ७.३० वाजता बुवा दिनेश वागदेकर विरुद्ध संदिप लोके बुवा यांचा डबलबारी सामना, २९ ला रात्री ९.३० वाजता मालती प्रोडक्शन प्रस्तुत ‘रंग हा लावणीचा’ (रत्नागिरी कलाकारांचा जल्लोष), ३० ला रात्री ९.३० वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण-कुडाळ यांचे दशावतार नाटक, १ ऑक्टोबर रात्री ९.३० वाजता श्री राधाकृष्ण कलामंच, मुंबई यांचे दोन अंकी मालवणी नाटक ‘वाट चुकलो देव’, २ ऑक्टोबर विजयादशमी निमित्त सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजा व तिर्थप्रसाद तसेच रात्री ९ वाजता ऑर्केस्ट्रा झंकार (कोल्हापूर). ३ ऑक्टोबर दुपारी १ वाजता महाप्रसाद व सायंकाळी ५ वाजता दुर्गामाता विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून, सुरेल बेंजो ग्रुप, मेढा-मालवण या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्साही मित्र मंडळ, म्हापण यांनी केले आहे.