कोकण

सफाई कामगारांचे आंदोलन तूर्त स्थगित

CD

91860

सफाई कामगारांचे आंदोलन तूर्त स्थगित
प्रशासनाकडून कार्यवाहीची ग्वाहीः ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा ‘बेमुदत’
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ः येथील पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी पुकारलेले बेमुदत आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. प्रशासनाने कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्याचे आणि दोषींवर गुन्हे दाखल करत नवीन टेंडर काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आता हे आंदोलन मंगळवार (ता. ३०) पर्यंत स्थगित केले आहे. प्रांताधिकारी हेमंत निकम व प्रभारी मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय आंदोलकांनी घेतला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली.
येथील पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी त्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी काल (ता.१५) पासून ‘काम बंद आंदोलन’ आणि बेमुदत उपोषण सुरू केले होते. कंत्राटदाराने गेल्या चार वर्षांपासून सुमारे ६५ लाख रुपयांचा पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधी बुडवला आहे. याव्यतिरिक्त, किमान वेतन लागू करणे, समान कामासाठी समान वेतन देणे आणि वेळेवर वेतन मिळणे अशा त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते.
माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी देखील यात सहभागी होत कामगारांना न्याय देण्यासाठी लढा दिला. अखेर रात्री उशिरा प्रांताधिकारी निकम आणि प्रभारी मुख्याधिकारी नातू यांच्यासोबत नगरपंचायत कक्षात कर्मचाऱ्यांसह झालेल्या बैठकीनंतर कामगारांनी हे आंदोलन १५ दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने या कालावधीत भविष्य निर्वाह निधी बुडवल्याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करणे, नवीन टेंडर प्रक्रिया सुरू करणे आदी मागण्या प्रामुख्याने ठेवल्या आहेत.
या बैठकीत प्रशासनासोबत श्री. साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, कंत्राटी कामगार संघटनेचे नेते श्री. कांबळे, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, सुरेश भोगटे, देव्या सुर्याजी, बावतीस फर्नांडीस, निशांत तोरसकर, ॲड. राजू कासकर, रवी जाधव, अभय पंडित, संतोष गांवस, मनोज घाटकर, दीपक सावंत, प्रथमेश प्रभू, लक्ष्मण कदम आदी उपस्थित होते. या १५ दिवसांत त्यांच्या मागण्यांवर ठोस कारवाई झाली नाही, तर ३० नंतर पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा कामगारांनी दिला. कामगारांनी २५ पर्यंतची मुदत दिली होती. परंतु, प्रशासनाने कारवाईसाठी अधिक वेळ मागितल्याने ती ३० पर्यंत वाढवली आहे.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT