कोकण

रत्नागिरी ः रत्नागिरी शाखाध्यक्ष पदाचा मंत्री सामंतांनी दिला राजीनामा

CD

91826

अखिल भारतीय नाट्य परिषद - लोगो

सामंतांनी दिला रत्नागिरी शाखाध्यक्षपदाचा राजीनामा
विश्वस्त असल्याचे दिले कारण; कार्यभार कार्याध्यक्ष इंदुलकरांकडे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ः अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या अध्यक्षपदाचा उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी राजीनामा दिला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्तीचे उद्योगमंत्री सामंत हे विश्वस्त असल्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन अध्यक्षपदाची निवड होईपर्यंत रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार शाखेचे विद्यमान कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. १३) हॉटेल विवेक येथे झाली. या वेळी मंत्री डॉ. सामंत यांच्यासह नाट्य परिषदेचे कार्यवाह वामन कदम, उपाध्यक्ष श्रीकांत भाटवडेकर, खजिनदार सतीश दळी, सहकार्यवाह अमेय धोपटकर यांच्यासह परिषदेचे सभासद उपस्थित होते. या प्रसंगी वर्षभरात शाखेने केलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच पुढील वर्षाच्या उपक्रमाविषयी सविस्तर चर्चाही करण्यात आली. गतवर्षी झालेल्या खर्चाला सभेची मंजुरी घेण्यात आली तसेच पुढील वर्षासाठीच्या अंदाजपत्रकाला देखील मंजुरी घेण्यात आली. या प्रसंगी रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष मंत्री सामंत यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आपण नाट्य परिषदेचे विश्वस्त आहोत त्यामुळे मध्यवर्ती अंतर्गत असलेल्या एखाद्या शाखेचा अध्यक्ष राहणे उचित वाटत नाही. त्यामुळे रत्नागिरी शाखेचे अध्यक्षपद सोडत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत कार्याध्यक्ष इंदुलकर यांच्याकडे सुपूर्द करण्याची सूचना केली. त्यानुसार सर्वानुमते इंदुलकर यांच्याकडे अध्यक्षांचा पदभार देण्यात आला.


चौकट
उत्सवी नाटकांची महास्पर्धा २ ऑक्टोबरला
रत्नागिरी शाखेने गतवर्षी आयोजित केलेल्या नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांची महास्पर्धा यावर्षी २ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे, असे डॉ. सामंत यांनी सभेमध्ये जाहीर केले तसेच शाखेचे सभासद वाढवण्याबाबत देखील सूचना केल्या. १०० व्या नाट्यसंमेलनाचा समारोप रत्नागिरीत होणार असल्याने त्याची तयारी करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT