कोकण

रत्नागिरी ः कला उत्सव स्पर्धेत विभागात रत्नागिरीला भरघोस यश

CD

91883

कला उत्सव स्पर्धेत विभागात रत्नागिरीचा डंका
जिल्हास्तरीय स्पर्धा; १२ पैकी ६ कलाप्रकारात बाजी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : कला उत्सव स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धेतून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी विभागस्तरावर १२ पैकी ६ कलाप्रकारात प्रथम येऊन बाजी मारली. विभागस्तरावर प्रथम क्रमांक संपादन केलेले विद्यार्थी राज्यस्तरावर आता कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्पर्धकांना रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत शुभेच्छा देण्यात आल्या.
विभागात स्वरवाद्य वादनात श्रीरंग जोगळेकर (अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय), तालवाद्य वादनात ऋग्वेद रेमणे (अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय), एकल वाद्यवादनात सानवी देसाई व टीमने द्वितीय, एकल नृत्यप्रकारात स्वरा मोहिरेने (रा. भा. शिर्के प्रशाला) प्रथम क्रमांक मिळवला. दृश्यकला एकल त्रिमितीयमध्ये अश्मी होडे (फाटक हायस्कूल) हिने प्रथम, वरद मेस्त्रीने द्वितीय क्रमांक मिळवला. दृश्यकला एकल त्रिमितीयमध्ये सेजल साळवी, वेदा काळे (दोघीही सर्वंकष विद्यामंदिर) यांनी प्रथम आणि पारंपरिक कथाकथन स्पर्धेत आकांक्षा सप्रे व कीर्ती देवस्थळी (दोघीही दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी-शिवणे, संगमेश्वर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे) व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कला स्पर्धा पटवर्धन हायस्कूलमध्ये झाली. जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी १२ प्रकारातील विविध कलाप्रकारात सहभाग घेतला. यशस्वी स्पर्धकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन डायटच्या प्राचार्य नीता कांबळे यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, प्रा. सीमा इंगळे, कलाशिक्षकांचे सहकार्य लाभले. डाएटच्या वरिष्ठ अध्यापिका दीपा सांवत यांनी विभागप्रमुख म्हणून स्पर्धेचे नियोजन व व्यवस्थापन केले.

चौकट १
जिल्हास्तरीय निकाल
कलाप्रकार विद्यार्थ्यांचे नाव जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक या क्रमाने- गायन एकल- सार्था गवाणकर, सृष्टी तांबे, मीरा बापट; लोकनृत्य-आर्य कोंडविलकर व टीम, इरा सहस्रबुद्धे व टीम, भूमिका शेवडे व टीम; वाद्यवृंद-श्रीरंग जोगळेकर, ओजस करकरे, वेदांत पांचाळ; वाद्यवृंद- ऋग्वेद रेमणे, पार्थ कोंडविलकर, घनशाम जोशी; कोलाज-सानवी देसाई व टीम, मैत्रेयी देसाई व टीम, स्वरा मोहिरे; चित्रकला- अर्पिता बापट, गार्गी चिटणीस, विधी सावंत; हस्तकला- तेजस्विनी कुबडे, वरद मेस्त्री, ओम कोतवडेकर, वैदेही दिवटे, अश्मी होडे; वक्तृत्व-वेदांत पाल्ये, अर्णव मेस्त्री, सेजल साळवी, वेदा काळे, पर्णिका परांजपे, काव्या भुर्के, सारा वायंगणकर, वैदेही सावंतदेसाई, आकांक्षा सप्रे, कीर्ती देवस्थळी, पूर्वा जोशी, मंजिरी सावंत, श्रावणी कल्लू, साक्षी वाघाटे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपला मोठा धक्का! एकाच दिवशी तीन नेत्यांनी सोडली साथ; शिंदे शिवसेनेत एन्ट्री

Dink Ladoo: हिवाळ्यात डिंक लाडू आरोग्यासाठी का आहे उपयुक्त? जाणून घ्या

Keshika Purkar : नाशिकच्या टेबल टेनिस स्टारची ऐतिहासिक कामगिरी; केशिका पूरकरने पटकावला 'तिहेरी मुकुट'!

Kolhapur News: हुपरीतील ‘चंदेरी नगरी’चा तेज हरपला; पाणीपुरवठा, अतिक्रमणे आणि निकृष्ट कामांमुळे नागरिक त्रस्त!

ज्या पद्धतीने मला रिजेक्ट केलं गेलं... 'अनन्या'मध्ये रिप्लेस झाल्याबद्दल ऋतुजा स्पष्टच म्हणाली, 'रवी जाधव यांना...'

SCROLL FOR NEXT