वक्तृत्व स्पर्धेत
श्रुतीला सुवर्णपदक
दापोली ः दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी श्रुती साखळकर (टीवाय बी.कॉम्) हिने मुंबई विद्यापीठ आयोजित वक्तृत्व-गट अ (मराठी) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. ही स्पर्धा मुंबई विद्यापिठाच्या विद्यार्थी भवनात झाली. यापूर्वी २५ ऑगस्ट रोजी खेड येथे विभागीय फेरीतून १२ झोनमधील ४४ विद्यार्थी अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. अंतिम फेरीसाठी ‘भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्यामध्ये व विकसित भारताचे स्वप्न साकारण्यात तरुणाईची भूमिका हा विषय दिला होता. श्रुतीने प्रभावी वक्तृत्व सादर करत सुवर्णपदकावर नाव कोरले. तिला या यशासाठी प्रा. कैलास गांधी, प्रा. संतोष मराठे, प्रा. तेजस मेहता, प्रा. स्वाती देपोलकर व प्रा. जान्हवी दिवेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
-------
रायपाटणमध्ये
विविध स्पर्धा
राजापूरः रायपाटण येथील शिवशक्ती युवा मित्र मंडळ टक्केवाडीतर्फे मुलांच्या कलागुणांना संधी देण्याच्या उद्देशाने वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांसह लहान मुलांच्या डान्स स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याला मुलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामधील रांगोळी स्पर्धेचे शैलेश रोडे, महेश गांगण, राजेश गांगण यांनी तर, डान्स व वक्तृत्व स्पर्धचे मंगेश पराडकर, शुभांगी सागरे, सुशांत जाधव यांनी परीक्षण केले. संतोष शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य आणि ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.
---------
टाळसुरे विद्यालयाचे
कबड्डी स्पर्धेत यश
दापोलीः क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सह्याद्री शिक्षणसंस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टाळसुरे विद्यालयाच्या १४ व १७ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाने अजिंक्यपद पटकावले. जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता दापोली तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी टाळसुरे विद्यालयाच्या मुलांना मिळाली आहे. १४ व १७ वर्षीय गटात टाळसुरे विद्यालयाने अजिंक्यपद पटाकवले आहे. टाळसुरे विद्यालयातील श्रेयश लाले, स्वीतेश लाले, वेदांत शिगवण, प्रभात पिंपळकर यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल आमदार शेखर निकम, महेश महाडिक, शांताराम खानविलकर, जयवंत जालगावकर यांनी अभिनंदन केले.
---------
rat16p24.jpg
91897
सर्व्हेश चव्हाण
rat16p25.jpg
91898
पार्थ शिंदे
टेबल टेनिस स्पर्धेत
‘घरडा’ची बाजी
चिपळूणः मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या कोकण विभागात लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाने बाजी मारली. विद्यापिठाच्या आंतरविभागीय टेबलटेनिस स्पर्धेसाठी ५ खेळाडूंपैकी घरडा महाविद्यालयाच्या २ विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. त्यामध्ये सर्वेश चव्हाण व पार्थ शिंदे यांचा सहभाग आहे. पुढील स्पर्धा मुंबई विद्यापीठ कॅम्पसमध्ये होणार आहेत. या कामगिरीबद्दल दोन्ही खेळाडूंचे क्रीडाशिक्षक प्रा. संजय बोले, क्रीडा कमिटी समन्वयक प्रा. ढवळे, प्राचार्य डा. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील, नोंदणी प्रा. संदीप मुंघाटे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.