rat१६p३०.jpg-
२५N९१९३९
रत्नागिरी : आठवडा बाजारातील भाजीविक्रेत्या महिलांना शासकीय योजनांची माहिती देताना देव, घैसास, कीर महाविद्यालयाचे विद्यार्थी.
भाजीविक्रेत्यांसाठी विद्यार्थ्यांचा सामाजिक हातभार
महिलांना दिली शासकीय योजनांची माहिती ; ‘डीजीके’ महाविद्यालयाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर (डीजीके) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला. महाविद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांनी शनिवार आठवडा बाजारातील भाजीविक्रेत्या महिलांची भेट घेऊन त्यांना शासनाकडून महिला व्यावसायिकांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. या वेळी समाजशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्रा. हर्षदा लिंगायत उपस्थित होत्या.
महाविद्यालयाच्या या उपक्रमात प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या कला शाखेतील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी केवळ भाजीविक्रेत्या महिलांशी संवाद साधला नाही, तर त्यांच्या व्यवसायातील अडचणी समजून घेतल्या. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी महिलांना त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी तयार केलेल्या माहितीपत्रकांचे वाटपही केले, ज्यात कर्जाच्या योजना, अनुदान, इतर सरकारी सहाय्याविषयीची माहिती सोप्या भाषेत नमूद करण्यात आली होती. समाजशास्त्र विभागाने राबवलेला हा उपक्रम महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला आहे.
चौकट
पुस्तकातील ज्ञान प्रत्यक्षात
विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील सामाजिक संशोधनाचे ज्ञान प्रत्यक्षात उपयोगात आणण्याची संधी या उपक्रमातून मिळाली. त्यांनी समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचून त्यांना मदतीचा हात दिला. हा उपक्रम केवळ शैक्षणिक नव्हता, तर समाजाप्रति असलेली जबाबदारी दर्शवणारा एक महत्त्वाचा प्रयत्न होता. या उपक्रमामुळे भाजीविक्रेत्या महिलांमध्ये सरकारी योजनांबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.