कोकण

नवरात्र उत्सवानिमित्त रेडीत विविध कार्यक्रम

CD

नवरात्र उत्सवानिमित्त
रेडीत विविध कार्यक्रम
सावंतवाडी ः सिद्धेश्वर नवयुवक मित्रमंडळ, रेडी नवरात्र उत्सवानिमित्त श्री देव सिद्धेश्वर मंदिर, रेडी सुकळभाटवाडी येथे २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रोज सकाळी पूजा व सायंकाळी स्थानिक भजने होणार आहेत. तसेच २५ ला रात्री ८ वाजता लोककला दशावतार नाट्यसंगीत रजनी कार्यक्रम होणार असून यात मयुर गवळी (गायक व हार्मोनियम वादक), स्वप्नील निकम (पखवाज), पप्पू सावंत (झांज), सूत्रसंचालन राजा सामंत करणार आहेत. २६ ला अणसूर येथील भजन, २७ ला रात्री ९.३० वाजता डबलबारी जंगी भजनाचा सामना वर्दे-कुडाळ येथील हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे बुवा गुंडू सावंत विरुद्ध लिंगडाळ-देवगड येथील श्री वडची देवी प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संदीप लोके यांच्यात रंगणार आहे. सावंत यांना विराज बावकर (पखवाज) व संकेत गोसावी (तबला) तसेच लोके यांना योगेश सामंत (पखवाज) व संदेश सुतार (तबला) संगीत साथ देणार आहेत. २८ ला रात्री ८ वाजता मिरजकर गोंधळ मंच कणकवली यांचा गोंधळ, २९ ला सायंकाळी ६ वाजता बादल चौधरी यांच्यासोबत ''खेळुया खेळ पैठणीचा'', ३० ला रात्री दांडिया, १ ऑक्टोबरला भजन व पालखी प्रदक्षिणा, २ ला सिद्धेश्वर मंदिर ते माऊली मंदिर पालखी होणार आहे.
........................
वेंगुर्लेत २२ पासून
नवरात्रौत्सव
वेंगुर्ले ः येथील ग्रामदेवता श्री सातेरी मंदिरात २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यात २२ ला सकाळी ९ वाजता घटस्थापना आणि उत्सवाची सुरुवात होणार आहे. २२ ते ३० सप्टेंबरपर्यंत अभंग, भक्तिगीत गायन, संगीत व वारकरी भजने आणि आरती आदी कार्यक्रम, १ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता नवचंडी होमहवन, पूर्णाहूती आणि उत्सवाची सांगता. उत्सव कालावधीत देवीच्या नऊ रुपांचे दर्शन, सजावट, पुष्पपूजा असे कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.
........................
ठाकरे शिवसेनेतर्फे
वेंगुर्लेत नृत्य स्पर्धा
वेंगुर्ले ः वेंगुर्ले ठाकरे शिवसेनेतर्फे नवरात्र उत्सवानिमित्त मंगळवारी (ता. २३) सायंकाळी ७ वाजता तालुका रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १२ वर्षांखालील लहान गट व १२ वर्षांवरील मोठा गट अशी घेण्यात येणार आहे. लहान गटातील प्रथम तीन क्रमांकांस अनुक्रमे १५००, १०००, ७००, तर उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी ५०० व चषक तसेच मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे २०००, १५००, १०००, तर उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी ७०० रुपये व चषक देण्यात येईल. स्पर्धकांनी आपली नावनोंदणी वैभव फटजी यांच्याकडे करावी. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
..............................
वेतोरेत सोमवारी
‘दुर्गामाता दौड’
वेंगुर्ले ः वेतोरे गावात दुर्गामाता दौडचे आयोजन सोमवारी (ता. २२) सकाळी ७.३० वाजता करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजता वेतोरे तिठा येथून दुर्गामाता दौडला प्रारंभ होईल. देवी सातेरी मंदिरात समारोप होईल. सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिवप्रेमी, वेतोरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT