swt1721.jpg
92220
मुंबईः चिन्मय सावंत, सुबोध मालंडकर यांनी ‘उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक’चा पुरस्कार पटकावला.
चिन्मय, सुबोध मालंडकर
‘उत्कष्ट संगीत दिग्दर्शक’
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १७ः मुंबई येथे झालेल्या ५० व्या आय. एन. टी. च्या एकांकिका स्पर्धेत सिंधुदुर्गातील संगीतकार जोडी चिन्मय सावंत आणि सुबोध मालंडकर यांनी ‘उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक’ हा मानाचा किताब पटकावला. याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. या स्पर्धेत सादर झालेल्या ‘मढं निघालं अनुदानाला’ (दिग्दर्शक महेश कापरेकर व सागर चव्हाण) या एकांकिकेने प्रेक्षकांची दाद मिळविली. नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला असून, दिग्दर्शक जोडीला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
चिन्मय सावंत हे कणकवली तालुक्यातील तिवरे येथील, तर सुबोध मालंडकर हे मालवण-कट्टा येथील आहेत. प्रभावी मांडणी, अभिनय व संगीतकार जोडीने दिलेल्या संगीतामुळे या एकांकिकेने सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अक्षय केळकर, अभिनेत्री पूर्णिमा केंढे, रंगकर्मी राजेश वराडकर, दिग्दर्शक सिद्धार्थ साळवी, रामचंद्र गावकर, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार कांटे, सुजय हांडे, तन्वी बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
.....................
swt1722.jpg
92221
मालवणः रक्तदात्यांना प्रमाणपत्र देताना मान्यवर.
मालवणमध्ये शिबिरात
५८ जणांचे रक्तदान
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १७ : शहरातील बाजारपेठेतील श्री हनुमान मंदिरातील गणेशोत्सवानिमित्त श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि धक्का मित्रमंडळ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ५८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी ओरोस येथील जिल्हा रक्तपेढीच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करून दोन्ही मंडळातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी श्री मंडळांचे यांचे सदस्य व व्यापारी उपस्थित होते.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.