92248
आजगाव आरोग्य शिबिरात
चिकित्सेसह मोफत औषधे
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १७ः संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आजगाव येथे मळेवाड आरोग्य केंद्राच्या वतीने एक दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबडुकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खेबुडकर यांनी शिबिराबाबत माहिती घेत नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश कर्तसकर, मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम मस्के, आजगाव सरपंच यशश्री सौदागर, उपसरपंच सुशील कामटेकर, आरोग्य सहाय्यक यू. टी. राणे, ग्रामपंचायत अधिकारी संदीप गवस उपस्थित होते. आजगाव येथील प्राथमिक शाळा क्र. १ येथे आयोजित शिबिरात विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करून औषधे देण्यात आली. ग्रामस्थांची नवीन ‘आभा’ कार्ड काढण्यात आली.
यावेळी जे.टी. नवार, आरोग्य सेविका संतोषी मळगावकर, एनसीडी स्टाफ अर्पणा शिंदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ एस. एस. कामत, आरोग्य सेवक शंकर पार्सेकर, वाहनचालक प्रभाकर पार्सेकर, परिचर सायली नाईक, समुदाय आरोग्य अधिकारी प्रसाद जोशी, आरोग्य सेवक, आशाताई व मदतनीस, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.