rat18p1.jpg -
25N92329
पंडित गोविंदराव पटवर्धन
शंभर संवादिनीवादक देणार पंडित गोविंदराव यांना मानवंदना
नाट्यगितांची सिम्फनी; उद्या सावरकर नाट्यगृहात ‘शतसंवादिनी’
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः पंडित गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी सांगता सोहळ्यानिमित्त चैतन्यस्वर आणि सहयोग रत्नागिरी यांच्यावतीने येत्या २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात जाई काजळ प्रस्तूत शतसंवादिनी २.० हा कार्यक्रम होणार आहे. नाट्यगितांची सिम्फनी हा अनोखा प्रयोग या वेळी सादर होणार आहे.
गतवर्षी २१ सप्टेंबरला १००हून अधिक संवादिनीवादकांच्या साथीने सादर झालेल्या शतसंवादिनी कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्याचा पुढील भाग म्हणून शतसंवादिनी २.० चे आयोजन केले आहे. यामध्येही १००पेक्षा अधिक संवादिनी वादक, ऑर्गनवादक व तालवाद्य साथीदार सहभागी होणार असून, सुप्रसिद्ध नाट्यगितांवर आधारित आगळीवेगळी हार्मोनियम सिम्फनी सादर होईल. या कार्यक्रमाची निर्मिती ज्येष्ठ संवादिनीवादक आणि संगीतकार अनंत जोशी यांच्या संकल्पनेतून झाली आहे. संपूर्ण सिम्फनीचे संगीत दिग्दर्शनही अनंत जोशी यांचे असून, रत्नागिरीतील सर्व हार्मोनिअम शिक्षक तसेच रत्नागिरी आणि मुंबईत संवादिनी शिकणारे शिष्यवर्ग यात सहभागी आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा पेठे करणार आहेत. तबलासाथ आदित्य पानवलकर आणि प्रथमेश शहाणे तर इतर तालवाद्याची साथ अद्वैत मोरे व राघव पटवर्धन यांची असेल. शंभर संवादिनीवादक, ऑर्गनवादक तालवाद्य साथीदार यांची एकत्रित ध्वनिसंयोजन बाजू एस. कुमार साउंडचे उदयराज सावंत सांभाळणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीतकार आप्पा वढावकर, ज्येष्ठ तबला गुरू पंडित आमोद दंडगे हे उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.