-rat१८p२९.jpg-
P२५N९२४२९
राजापूर ः मिस इंडिया विजेती सायली भगत, एआयसीपीचे मॅनेजिंग डायरेक्टर शरद तिवारी, कविता तिवारी यांच्या हस्ते ‘इंडिया टॉप हंड्रेड इन्स्टिट्यूट’ पुरस्कार स्वीकारताना सुगंधा पुजारी.
---
ओंकार कॉम्प्युटर संस्थेचा गौरव
राजापूर, ता. १८ : राजापूर तालुक्यामध्ये संगणक प्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि गेल्या तीस वर्षापासून कार्यरत असलेल्या ओंकार कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटला एआयसीपी या नामांकीत संस्थेतर्फे ‘इंडिया टॉप हंड्रेड इन्स्टिट्यूट’ या राष्ट्रीयस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार मिस इंडिया विजेती सायली भगत, एआयसीपीचे मॅनेजिंग डायरेक्टर शरद तिवारी, कविता तिवारी यांच्या हस्ते ओंकार इन्स्टिट्यूटच्या संचालिका सुगंधा पुजारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.