-rat१८p३१.jpg-
२५N९२४६२
रत्नागिरी : भाजपच्या जिल्हा कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलताना राजेश सावंत व प्रशांत डिंगणकर. सोबत डावीकडून मंदार खंडकर, विवेक सुर्वे.
-----
जीएसटी दरकपातीचा रत्नागिरी जिल्ह्याला फायदा
प्रशांत डिंगणकर ः भाजपतर्फे व्यापारी मेळावे होणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : व्यावसायिकांसाठी जीएसटी २.० मधील कपात खूपच फायदेशीर असून, सर्वसामान्यांना त्याचा दिलासा मिळणार आहे. येत्या २२ पासून अनेक वस्तूंचे दर कमी होतील. यामुळे महागाईचा दरसुद्धा कमी होईल. याबरोबर स्वदेशीचा वापरही नागरिकांनी वाढवावा. व्यापारी, दुकानदार, व्यावसायिकांना या जीएसटी २.० मधील बदल मेळाव्यांद्वारे समजावून सांगण्यात येणार आहेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील मेळाव्यात व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती जीएसटी २.० भाजप जिल्हा संयोजक प्रशांत डिंगणकर आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डिंगणकर यांनी सांगितले की, भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवाकरांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. नव्या कररचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबर जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळणार आहे. दरकपातीमुळे देशातील प्रत्येक राज्यातील जनतेला, कुटुंबाला, गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना, लहान-मोठ्या उद्योजकांना, व्यापाऱ्याला आणि व्यावसायिकांना फायदा होणार आहे.
अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. केंद्र आणि राज्यसरकारांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने सुधारणांचा नवा प्रस्ताव एकमताने संमत केला. भाजपाच्या जिल्हा संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेला सोशल मीडिया प्रमुख ओंकार फडके, मंदार खंडकर, मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे, दादा दळी, प्रतीक देसाई, सुशांत पाटकर, पल्लवी पाटील, दादा ढेकणे आदी उपस्थित होते.
चौकट १
जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार
सामान्य माणूस, शेतकरी, मध्यम व लघुद्योग क्षेत्र, मध्यमवर्गीय समाजघटक, महिला आणि युवावर्गास या सुधारणांमुळे होणाऱ्या नव्या अर्थनीतीचा लाभ होईल. सध्याच्या चारस्तरीय कररचनेचे सुसूत्रीकरण करून केवळ १८ आणि ५ टक्के एवढ्या दोन स्तरांत नवी जीएसटी करआकारणी होणार असल्याने अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा हलका किंवा नाहीसा होणार आहे, असे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.