कोकण

नांदरुखमध्ये पाणंद, पायवाटांच्या सिमांकनचा ठराव

CD

92485

पाणंद, पायवाटांच्या सिमांकनचा ठराव

नांदरुख ग्रामसभा; ‘समृद्ध पंचायत’साठी समिती स्थापन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ ः नांदरुख (ता.मालवण) गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. तसेच यासाठी समिती स्थापन करण्यात आली. यावेळी गावातील पारंपारिक शेत पाणंद रस्ते, पायवाटा रस्ते यांची यादी बनवून पुढे सिमांकन करून नंबर देण्यास ठराव पारित केला.
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार शासन स्तरावर विविध कार्यशाळा घेण्यात आल्या. शासनाच्या निर्देशानुसार सपूर्ण राज्यात एकाच दिवशी म्हणजेच काल (ता.१७) खास सभेचे आयोजन केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अभियानाच्या शुभारंभाची विशेष ग्रामसभा ग्रामपंचायत नांदरूख कार्यालयात सकाळी ११ वाजता यशस्वी पार पडली. या सभेला सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचात अधिकारी, कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, महमूल कर्मचारी, बचत गट सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी हे अभियान यशस्वीपणे राबविण्याचा संकल्प करण्यात आला. विशेष ग्रामसभेकरिता निरीक्षक म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सावंत हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी सेवा पंधरवडा कशाप्रकारे राबवायचे, अभियान स्पर्धा गुणांकन कसे असणार आहे, याबाबत मार्गदर्शन केले. सभेमध्ये गावातील रस्ते, पायवाटा, सेत पाणंद रस्ते यांचे सिमांकन करणे, तसेच सेवा पंधरवडा कार्यक्रम राबविणे, प्लास्टिक बंदि करणे बाबत चर्चा करून त्याबाबत ग्रामस्थाना माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान समिती केली. गावातील पारंपारिक शेत पाणंद रस्ते, पायवाटा रस्ते यांची यादी बनवून पुढे सिमांकन करून नंबर देण्याकरिता ठराव पारित केला. सर्वात शेवटी ही सभा यशस्वी होण्यासाठी महत्वाचा सहभाग दिलेल्या व्यक्तींचे आभार मानून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी राबविण्याचा संकल्प करून सभेची सांगता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs OMN : दोन बदलांसह भारत मैदानावर उतरला; सूर्यकुमार यादव खेळाडूंची नावं विसरला! म्हणाला, माझा रोहित झालाय...

Disha Patani house firing : पाचवा आरोपी एन्काउंटरमध्ये जखमी; पोलिसांना गयावया करत म्हणू लागला...

Madha News : सिना नदीवरील बंधारे व शेती सलग पाच दिवस पाण्याखाली

EPFO Update: 'पीएफ'ची सगळी माहिती एका क्लिकवर; काय आहे Passbook Lite?

Latest Marathi News Updates: कोथरूड गोळीबारप्रकरणी घायवळ गँगच्या ५ जणांना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT