वेरळ ग्रामपंचायतीत
पंचायतराज अभियान
लांजा ः तालुक्यातील वेरळ निर्मल ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायतराज अभियानाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचे प्रक्षेपण दाखवण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायत अभियानांतर्गत ही विशेष ग्रामसभा झाली. त्यामध्ये १३५ ग्रामस्थ उपस्थित होते. ही सभा कोरम पूर्ण करून यशस्वीरीत्या पार पडली. सेवा पंधरवडाचे उद्घाटन करण्यात आले. पारंपरिक पायवाट, गोवंड, शेतपाणंद रस्ते यावर चर्चा करण्यात आली तसेच ग्रामसभेने एकमताने या उपक्रमाला मंजुरी दिली. त्यासाठी वेरळ सजाचे तलाठी यांनी याबाबत जनजागृती व मार्गदर्शन केले. सभेला वेरळ गावच्या सरपंच सुवर्णा जाधव, उपसरपंच श्रावणी जाधव, ग्रामपंचायत सदस्य इक्बाल टोले, शरद चरकरी, मंगेश डाकवे, महेश गुंड्ये, ग्रामपंचायत अधिकारी दीपेश जोईल यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
‘युनायटेड’ची विभागीय
कबड्डी स्पर्धेसाठी निवड
सावर्डे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या १७ वर्षे वयोगटांमधील मुलींनी खेड येथील नवभारत हायस्कूल संघाचा १५ गुणांनी पराभव केला. अंतिम सामन्यात विजेतेपद मिळवले. या संघाची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्तरावर निवड झाली आहे. संघात श्रीया हुंबरे, ईश्वरी महाडिक, वैष्णवी महाडिक, सैवी भोबसकर, श्रुती पोसनाक, श्रेया खाडे, पायल अहिरे, आर्या पालांडे, सलोनी वाटेकर, प्रज्ञा थोरवडे व ईशा जड्याळ या विद्यार्थिनींचा समावेश होता. श्रीया आणि पायल यांनी जोरदार चढाया केल्या तर त्यांना ईश्वरी, वैष्णवी, सैवी, श्रेया, श्रुती यांनी चांगली साथ दिली. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाप्रमुख समीर कालेकर व नीतेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले तर व्यवस्थापक म्हणून सोळुंखे यांनी काम केले.
आठल्ये महाविद्यालयात
समुपदेशन कार्यक्रम
साडवली ः देवरूख ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात समुपदेशक वैष्णवी पुजारी यांनी एचआयव्ही, एड्स जनजागृती, किशोरवयीन मुलांचे मानसिक स्वास्थ्य व बदलती आहारशैली या विषयांवर मार्गदर्शन केले. या वेळी पुजारी यांनी एचआयव्ही व एड्सबाबत असलेले गैरसमज दूर करून प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली. किशोरवयीन मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आत्मविश्वास, सकारात्मक विचार व योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले तसेच बदलत्या आहारशैलीमुळे निर्माण होणारे आजार, फास्टफूडचे दुष्परिणाम आणि संतुलित आहाराचे फायदे या विषयीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे, प्रा. मयुरेश राणे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे यांनी मेहनत घेतली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.