- rat१९p९.jpg-
२५N९२६०१
रत्नागिरी ः सर्वोत्कृष्ट संशोधन पुरस्कार स्वीकारताना डॉ. पांडुरंग पाटील.
डॉ. पांडुरंग पाटील यांना पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः मुंबई विद्यापीठाच्या २०२३-२४ व २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात संशोधन, आदर्श शिक्षक तसेच अन्य पुरस्कार यांचे वितरण केंद्रीय अल्पसंख्याक कार्य व संसदीय कार्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये रत्नागिरी उपपरिसर येथील पर्यावरणशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पांडुरंग पाटील यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. पाटील पर्यावरणशास्त्र विभागाचे, रत्नागिरी उपपरिसर येथे एमएस्सी पर्यावरणशास्त्र विषयासाठी सहयोगी प्राध्यापक व पीएच.डी मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी पूर्ण केली आहे आणि देश-विदेशात काम करत आहेत. हवाप्रदूषण विषय व क्षेत्रामध्ये त्यांनी एनएएक्युएमअंतर्गत प्रकल्पप्रमुख म्हणून भूमिका बजावली. हा पुरस्कार संशोधनविषयक अनुदान प्रकारातून डॉ. पाटील यांना प्रदान करण्यात आला आहे. उपपरिसर संचालक डॉ. किशोर सुखटणकर, अभिनंदन बोरगावे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.