कोकण

-जिल्हापरिषदेतील ४७० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या

CD

जिल्हा परिषदेतील ४७० शिक्षकांच्या बदल्या
सहा संवर्गातील कार्यवाही पूर्ण; सातव्या टप्प्यातील बदल्या लवकरच
(शिक्षकांचे चित्र वापरावे)

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या सहा संवर्गातील ४७० शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या शिक्षकांना शुक्रवारी सायंकाळी कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे आता सातव्या टप्प्यातील बदल्या करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांमधील संवर्ग १ मध्ये दिव्यांग शिक्षक, गंभीर आजारी, अपंग, विधवा, परितक्त्या, ५३ वर्षांवरील शिक्षक यांचा समावेश होता. त्याचबरोबर संवर्ग २ म्हणजेच पतिपत्नी एकत्रीकरणांतर्गत पात्रसाठी ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले तसेच संवर्ग ३ मध्ये अवघड क्षेत्रातील बदलीसाठी पात्र ठरलेल्यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाने निश्चित केलेली अवघड क्षेत्रातील शाळांची यादी ग्राह्य धरण्यात आली. संवर्ग ४ मध्ये बदलीपात्र शिक्षकांचा समावेश करण्यात आला. एकाच शाळेत ५ वर्षे काम आणि अवघड क्षेत्रात १० वर्षे काम केलेल्या शिक्षकांचा समावेश करण्यात आला. या प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील आतापर्यंत ४७० शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झालेल्या आहेत. या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आल्याने आता एकाच शाळेत ५ वर्षे पूर्ण न झालेल्या शिक्षकांना या अवघड क्षेत्रात जावे लागणार, हे लक्षात आल्यानंतर काही शिक्षक त्या विरोधात न्यायालयात गेले होते; मात्र, ही स्थगिती उठवण्यात आल्याने सातव्या टप्प्यातील बदलीची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांना जावे लागणार आहे. बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आल्याने ते शिक्षक बदली झालेल्या शाळेवर हजर होत आहेत.

चौकट
बदली पात्र शिक्षकांची संख्या कमी
सलग दोन वर्षे बदली प्रक्रिया राबवली जात असल्याने बदलीसाठी पात्र ठरणाऱ्या शिक्षकांची संख्या यंदा कमी होती. एखाद्या वर्षी बदल्या झाल्या नाहीत तर अवघड क्षेत्रात काम करणारे शिक्षक अन्यत्र जाण्यासाठी पात्र ठरतात. त्यामुळे एकाचवेळी बदल्यांसाठी पात्र ठरलेल्यांचा आकडा वाढतो. त्यामधून गोंधळ होतो आणि प्रक्रिया लांबते. यावर्षी थोडा विलंब झाला असला तरीही बदल्यांसाठी शिक्षक कमी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs OMN : दोन बदलांसह भारत मैदानावर उतरला; सूर्यकुमार यादव खेळाडूंची नावं विसरला! म्हणाला, माझा रोहित झालाय...

Disha Patani house firing : पाचवा आरोपी एन्काउंटरमध्ये जखमी; पोलिसांना गयावया करत म्हणू लागला...

Madha News : सिना नदीवरील बंधारे व शेती सलग पाच दिवस पाण्याखाली

EPFO Update: 'पीएफ'ची सगळी माहिती एका क्लिकवर; काय आहे Passbook Lite?

Latest Marathi News Updates: कोथरूड गोळीबारप्रकरणी घायवळ गँगच्या ५ जणांना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT