कोकण

‘खरेदी विक्री’ला साडेतीन लाखांचा नफा

CD

92661

‘खरेदी विक्री’ला साडेतीन लाखांचा नफा

प्रमोद रावराणे ः खत, किटकनाशके विक्रीसह भात खरेदीतून लाभ

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १९ ः तालुका खरेदी विक्री संघाने या आर्थीक वर्षात रासायनिक खत विक्री, भात खरेदी, किटकनाशक विक्रीसह विविध व्यवसाय करीत ३ कोटी १४ लाख २८ हजार १३९ रूपयांची उलाढाल केली असून त्यातून ३ लाख ५८ हजार ३०४ रूपयांचा निव्वळ नफा मिळविला असल्याची माहीती तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी येथे दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात श्री. रावराणे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उपाध्यक्ष अंबाजी हुंबे, बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील, सीमा नानीवडेकर, महेश रावराणे, पुंडलिक पाटील, उज्वल नारकर, सिध्देश रावराणे आदी उपस्थित होते. श्री. रावराणे म्हणाले, ‘‘तालुका खरेदी विक्री संघाने गेल्या काही वर्षात अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून मार्गक्रमण केले आहे. गेल्या वर्षभरात संघाने रासायनिक खत विक्रीतून १ लाख ७२ हजार ३०५ रुपये, भात बी बियाणे विक्रीतून ६ लाख ५ हजार १९५, सेंद्रीय खते विक्रीतून ३ लाख २१ हजार २०९, किटकनाशके विक्रीतून १ लाख ६६ हजार २२०, शेती अवजार विक्रीतून १ लाख ६६ हजार ३०५, पशुपक्षी खाद्य विक्रीतून ९ लाख ६५ हजार ५ आणि भात खरेदीतून १ कोटी ९९ लाख ८ हजार ९०० रूपये अशी ३ कोटी १४ लाख २८ हजार १३९ रूपयांची उलाढाल केली आहे. यातून संघाला ३ लाख ५८ हजार ३०४ रूपये इतका निव्वळ नफा झाला आहे.’’
--------
संघाची सर्वसाधारण सभा २७ ला
रावराणे म्हणाले, ‘‘संघाची सर्वसाधारण सभा २७ ला मेजर कौस्तुभ रावराणे सभागृहात होणार आहे. या सभेनंतर तालुक्याचा सहकार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यात प्रथमच सेवा पंधरावडातर्गंत सहकार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याला पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे आदी उपस्थित राहणार आहेत. या सहकार मेळाव्याला तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur: मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर हल्ला; दोन जवान हुतात्मा, छायाचित्रे व्हायरल

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंत्री समिती व शिखर समितीची स्थापना; नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

IND vs OMN Live: स्वप्न पाहिलेलं २००चं, पण...! Sanju Samson उभा राहिला; अभिषेक, तिलक, अक्षर यांचे योगदान; सूर्या आलाच नाही

‘माया’च्या निधनाने पोलिस अधिकारीही हळहळले! जर्मन शेफर्ड जातीचे श्वान होते सोलापूर शहर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाचा आधार; बॉम्ब शोधण्यात माया होती एक्स्पर्ट

Pune Water Issue : पाणी कपातीचा प्रस्ताव महापालिकेने धुडकावला; जॅकवेलच्या हस्तांतरणासही विरोध

SCROLL FOR NEXT